Weather Updates: मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आता पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाली आहे. विदर्भात पावसाचा जोर प्रचंड वाढत आहे ज्यामुळे नद्यांना पूर आले आणि धरणांमध्ये पाणीसाठा प्रचंड वाढला आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात आजपासून पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होणार असला तरी विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाला दिला आहे.
विदर्भातील गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः कहर केला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पासून राज्यात पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात आजही अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूत्रानुसार नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे.
हे पण वाचा| पीएम किसान योजनेचे ₹2000 खात्यावर आलेत की नाही? ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी..
कोकणातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता
फक्त विदर्भातच नाही तर कोकणातही पावसाने गेल्या दोन-तीन दिवसापासून चांगलाच जोर धरला आहे. घाटमाथ्यावरील पावसाचा जोर जास्त होता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या आवाहन हवामान विभागाने केले आहे. Weather Updates
राज्याच्या उर्वरित भागातील जिल्ह्यांना मात्र थोडा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. असा अंदाज आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसानंतर आता या भागात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सदर कथेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि हवामान विभागाने दिलेल्या काटेकोर सूचनेचे पालन करावे.
पूरग्रस्त किंवा सकल भागातील रहिवाशांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसात हवामानातील बदलावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्यापासून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी या जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथील नागरिकांनी कोणत्याही हयगय न करता सुरक्षितता बाळगावी.