महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…


Weather Updates: या हंगामात राज्यात पावसाचे वातावरण थोड्यावेगळेच दिसत आहे. यावर्षी पावसाला मान्सूनपूर्वी सुरुवात झाली, राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. त्यानंतर राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी लावली. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे उकाडा वाढल्याने तापमान वाढल्याचे दिसत आहे.

मात्र तरीदेखील येत्या दोन ते तीन दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे हवामान विभागाने काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात राज्यात अति मुसळधार ती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देखील देण्यात आले आहे.

हे पण वाचा| व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली नव्या फीचरची एन्ट्री, बघा आता काय मिळणार नवीन फायदा..

IMD च्या अंदाजानुसार शनिवारी 21 जून 2025 रोजी मुसळधार पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील नदी नाल्या धोक्याच्या पातळीच्या वर गेले आहेत. पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा त्याचबरोबर पुण्याच्या घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने या भागातील शेतकऱ्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. Weather Updates

मुंबई पुणे रायगड नाशिक रत्नागिरी आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे नाशिक यांना संभाव्य पूर आणि धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड मध्ये आंबा आणि कुंडलिका नद्यांनी डोक्याची पातळी ओलांडली आहे. पातळगंगा नदी साठी देखील सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी मध्ये जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आंबा आणि जगबुडी सारख्या नद्यांमुळे त्यांच्या काठावरील काही शहरे पूरग्रस्त झाली आहेत.

हे पण वाचा| जून महिन्याचा हप्ता लवकरच, महिलांच्या खात्यात होणार जमा आली मोठी अपडेट समोर

पश्चिम महाराष्ट्रात इंद्रायणी आणि इतर काही नद्यांनाही पूरग्रस्त जाहीर केले आहे. नाशिक मध्ये पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक हतेरी नदी ओहोर फ्लो झाल्यामुळे कुंडाळ तहसील मधील नादर गावाचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर तहसील मधील सुतांबे गावात भूसखलन झाले आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने म्हटले आहे की 22 ते 24 जून दरम्यान उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम 22 आणि 25 जून रोजी गंगे पश्चिम बंगाल 20 आणि 23 जून दरम्यान बिहार आणि 20 जून दरम्यान झारखंड आणि उडीसा मध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…”

Leave a Comment

error: Content is protected !!