Weather Update : राज्यातील या 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो सावध राहा


Weather Update : 1 जून रोजी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि राज्यातील अनेक भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. या काळामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण विदर्भ या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय आहे तर उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. Weather Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक

यंदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी म्हणजे मान्सूनची (Monsoon 2025) वेळेपूर्वी महाराष्ट्रामध्ये आगमन. खरंतर हे ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. परंतु शेतकऱ्यांना योग्य नियोजन केले अन्यथा त्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागेल. राज्यात मे महिन्यात जो जून महिन्यात पडत नाही असा पाऊस पडला आहे आणि पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. परंतु राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव (Punjab Dakh) यांनी देखील हवामान अंदाज वर्तवत राज्यात सात जून पर्यंत पावसाची विश्रांती असल्याचे म्हटले आहे. तर हवामान विभागाने एक जून रोजी विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येईल आदर्श जाहीर केलेला आहे तर विविध भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही असं म्हटले आहे. तर हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिला आहे याची स्थिती कशी राहील हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांना एक जून रोजी म्हणजे आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करायचे आहे खास करून या जिल्ह्यांनी.

तर कोकणातील पुढील दोन दिवसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये एक जून रोजी म्हणजे आज आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर याच पार्श्वभूमी वरती ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे.

तर त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु या पार्श्वभूमी वरती या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलेही काळजी करण्याची गरज नाही.

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या शहरात ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. असं हवामान विभागाने माहिती दिलेली आहे. तर त्याचबरोबर मराठवाड्यातील काही बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु इथे कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

तसेच धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या चारी जिल्ह्यामध्ये हलकाचे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर मध्ये एक जून रोजी ढगाळ आकाश राहून दुपारी किंवा सायंकाळ नंतर पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.

अमरावती, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्या भागात अलर्ट जारी केलेला आहे तिथे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हवामान विभागाचे सूचनांचे पालन करा. आणि वेळोवेळी हवामान अपडेट कडे लक्ष द्या.

हे पण वाचा : Rain Update : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट तुमच्या जिल्ह्याच नाव आहे का पहा

1 thought on “Weather Update : राज्यातील या 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो सावध राहा”

Leave a Comment

error: Content is protected !!