Weather Update | खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन करावा लागत आहेत. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहिले मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा दिल्याने शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करू.Weather Update
पश्चिम बंगालच्या खाडी मधून आणि गुजरातच्या दिशेने सायक्लोनिक सेक्युरलेशन एकाच वेळी तयार झाल्याने अनेक ठिकाणी चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट चा इशारा दिलेला आहे. यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
राज्यातील परिस्थिती पाहता, कधी जास्त उन तर कधी अचानक गारपीट अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर उत्तरेकडील उष्णतेचे लाथ आणि पावसाचा अलर्ट असे दोन्ही संकट महाराष्ट्रावरती निर्माण झालेले आहे.
आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हिंगोली, परभणी, अकोला, नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी 40-50 किमी ताशी वेगाने वारे वातील असा इशारा दिलेला आहे.
या जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा
यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा सह गारपिटीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अशाच नवीन हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज