Weather update | एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. भारतीय हवामान खातेने राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने, शेतकऱ्याचे चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आय एम डी च्या इशारानुसार, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव हवामान अंदाज वर्तवला. तर परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी नुसता पाऊसच नाही तर विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. Weather update
राज्यावरती हे मोठे दुहेरी संकट आले आहे. रायगड, कोकण पट्ट्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये गारपीट व मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये मोठी वाढ होत चाललेली आहे.
हे पण वाचा | हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये 21 मार्च मध्ये आज गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांनी देखील सतर्क करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. 22, 23 मार्च रोजी देखील अवकाळी पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामान अंदाज आकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. ही परिस्थिती बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यासह विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी देखील उन्हाचे चटके मात्र कायम राहणार आहेत.
तर लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आहे. लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने गहू, हरभरा ज्वारी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामुळे शासनाकडून कोणती मदत मिळते का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
अशाच नवनवीन हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व आपल्या शेतकरी मित्रांना हा हवामान अंदाज नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हवामानाचे अपडेट ची माहिती मिळेल.
हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!