Weather Update | राज्यातील परिस्थिती पाहता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता काहीसा थांबलेला दिसतोय, पण हवामान विभागाने दिलेला ताज्या अपडेट नुसार, पुन्हा एकदा काही जिल्ह्यांना विजांसह जोरदार पावसाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. Weather Update
राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या थोडाफार कमी झालेला आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अनुभव आपल्याला पाहिलेला मिळाला. अशातच विदर्भाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आता मोठा इशारा हवामान विभागाने जारी केलेला आहे. हवामान खात्याच्या अपडेट नुसार, झारखंड आणि आजूबाजूच्या भागांवर सुमारे 8.5 किमी उंचीवर चक्रकार वारे सक्रिय आहेत. यासोबतच एक कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून बंगालचा उपसागरात पसरलेला आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण गुजरात ते झारखंड पर्यंत कमी दाबाचे दुसरे केंद्र सक्रिय झाला आहे. या साऱ्या प्रणालीमुळे हवामानात चढ-उतार सुरू राहणार आहेत. काही भागात पावसाचे विश्रांती असली तरी पुन्हा एकदा ढगांची गर्दी, विजा आणि सरींचं धोरण तयार होत आहे.
गेल्या 24 तासात नेमकं काय घडलं?
११ जुलै च्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळ्या. सोलापूर शहरात राज्यातील सर्वाधिक तापमान तब्बल 33.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेला आहे. कोल्हापूर, नाशिक सारख्या भागात हवामान ढगाळ असून उष्णता वाढलेली दिसते.
या जिल्हाना Yellow Alert
आज १२ जुलै रोजी हवामान विभागाच्या ज्या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, ते म्हणजे उत्तर महाराष्ट्र जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना तसेच विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात विजांचा कडकडाटात अनिवार यांचा वेग तसेच जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली या भागांमध्ये थोडं उघड वातावरण पाहायला मिळते. मात्र पावसाने विश्रांती घेतली तरी काही नव्या प्रणालीमुळे पुढील आठवड्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शासनाच्या आणि हवामान विभागाच्या सूचनेचा नीट पालन करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!