Weather News Alerts : संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट गडद झाल आहे. मागील काही दिवसांपासून राज्याचा तापमानाचा पारा उंचांकी गाठत असताना, आता अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी गारपिटीचा “हाय अलर्ट” जारी केला आहे, तर उर्वरित महाराष्ट्राची मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.Weather News Alerts
गेल्या 24 तासात देशाच्या विविध भागात वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात पहाटेच्या सुमारास काही जिल्ह्यात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार, पुढचे तीन दिवस म्हणजे 26,27 आणि 28 एप्रिल महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
कुठे किती धोका?
विदर्भात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. ब्रह्मपुरीत काल 54.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्या असताना, आता गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यात हवामान विभागाने गारपिटचा विशेष इशारा दिलेला आहे. त्यामुळे इथला शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
26 एप्रिल ला या जिल्ह्यांमध्ये इशारा :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
27 एप्रिल ला या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
28 एप्रिलला ही अवकाळीचा धोका कायम:
28 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होऊ शकतं. या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपली पिका सुरक्षित करण्यासाठी शक्यते उपाय करावेत, असं आव्हान हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
या अवकाळी पावसामुळे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांचा धोका आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि शेतकरी बांधवांनी आपली पीक व घर सुरक्षित ठेवावी. तसेच हवामान विभागाच्या पुढील सूचनाकडे लक्ष द्यावे आणि हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
हे पण वाचा | आजचा मोठ हवामान अपडेट: भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट!