हवामानात मोठा बदल! IMD चा अलर्ट पुढील सात दिवसात जोरदार पावसाची शक्यता

Weather Forecast News : भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या अपडेट मुळे सर्वांची चिंता वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील हवामान बदलाचा अलर्ट जारी केलेला आहे. हिवाळा संपत असताना उन्हाळ्याची चाहूल लागत असताना अनेक भागांमध्ये काही दिवसात पावसाची स्थिती निर्माण होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने पष्ट केलेले आहे. काही राज्यांमध्ये अति मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी व शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करायचे आहे चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज. Weather Forecast News

ईशान्य भारतात पावसाचा इशारा

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून याचा परिणामी क्षण भारतातील हवामानावर होणार आहे. 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्किम या राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर आणि पश्चिम भारतात हवामान

फेब्रुवारी महिन्यामध्ये हवामानात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. दिल्ली एनसीआर उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर उत्तरे राज्यांमध्ये कडक उन्हाचा अनुभव येणार आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 19 व 20 फेब्रुवारी हलक्या प्रमाणात पाऊस व हिम्मदृष्टी होण्याची शक्यता आहे.

राजस्थान, पंजाब आणि हरियाणा मध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच पंजाब आणि हरियाणा मध्ये 19 ते 20 फेब्रुवारी दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

हे पण वाचा | IMD चा मोठा इशारा, आता आणखी एक नव संकट; भारतीय हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात पुढील काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याचा अंदाजानुसार काही ठिकाणी अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि आयएमडीच्या अंदाजानुसार नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे.

अशाच हवामान अंदाज माहितीसाठी आमच्या पेजला दररोज भेट देत रहा, आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!