Weather Forecast Maharashtra | राज्यात उन्हाच्या जळा वसरत असतानाच वादळी पावसाचा आगमन झाला आहे. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना अनेक भागात पावसाच्या सरी पडू लागल्या असून हवामान विभागाने पुढील दोन ते पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा जोर यासह वादळी पावसाची शक्यता असल्याचा स्पष्ट करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकरी, कामगार, प्रवासी आणि शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आलेले आहे. Weather Forecast Maharashtra
शनिवारी पहाटेपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं. सकाळच्या नऊच्या सुमारास वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली आशा उपनगरांमध्ये हलक्या सरी पडू लागल्या. काही वेळातच य पावसाचा जोर वाढत गेला आणि अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली. ही स्थिती रविवारी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये गडगडाटसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मुंबई सह कोकणातील हवामान सध्या अत्यंत अस्थिर झाला असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे.
केवळ कोकणच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे जिल्ह्यातील पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या भागांमध्ये विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि झंझावाती वाऱ्यांची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास इतका होऊ शकतो. विदर्भात तर आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता. अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर सारख्या शहरांमध्ये पुढील चार ते पाच दिवस सतत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना होणार असून विजा कोसळण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. मराठवाड्याची पावसाचे चित्र असंच आहे. बीड, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली अशा भागांमध्ये पाच दिवस हवामान अस्थिर राहील.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्रकार वार्यांचे केंद्र तयार झाला आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय. त्यामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी उष्णताची तीव्रता असूनही अचानक ढगांचा गडगडाट होत आहे आणि जोरदार वाऱ्यांसह सरी कोसळत आहेत.यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे टाकण्याच्या तयारी उतरण्या आधी थोडासा संयम बाळगावा आणि पेरणी करताना आपल्या शेतातील आणि वातावरणाचा अंदाज घ्यावा.
सध्याची स्थितीत मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत चालला आहे. नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तिथून पुढे महाराष्ट्र मध्ये पोहोचायला साधारण सात ते दहा दिवस लागतात. त्यामुळे मुंबईत 11 जून च्या आधीच मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या आधीच जे वातावरण तयार झाला आहे, ते पाहता यांना मान्सून वेळे आधीच दाखल होईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना ऐकून योग्य ती खबरदारी घ्यावी. विशेषता: ग्रामीण भागात विजा आणि वाऱ्यांचा धोका अधिक असतो. त्यामुळे उघड्यावर काम करताना, प्रवास करताना किंवा शेतात असताना काळजी घ्यावी. प्रशासनाकडून ही स्थानिक यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पावसाच्या या जडींना काही ठिकाणी उन्हाचे तीव्रता कमी झाली असली तरी विजेच्या कडकडाट भीतीचं वातावरण पसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहणार अत्यंत गरजेचे आहे.
हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!