राज्यात वातावरणात मोठा बदल; पुढील 48 धोक्याचे, वाचा नवीन अंदाज!


Weather Forecast : खरं सांगू, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं बेभान रूप सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आधीच नुकसान होत आहे तर नागरिकांची झोपच उडाली आहे. मे महिन्याच्या शेवटी लग्नसरा सुरू असल्याने लग्नात देखील नागरिकांची चांगली हाल होत आहे. लग्नामध्ये अचानक आलेल्य पावसाने लोकांचे जेवण व लग्नातील इतर कार्यक्रम देखील मागेपुढे करावे लागत आहे.

अशातच पुन्हा एकदा हवामान खाते अलर्ट दिलेला आहे हा अलर्ट काळजाचा ठोका चुकवणार आहे. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत नाजूक ठरणार असून जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गंभीर इशारा दिलेला आहे. जोरदार वाऱ्यांचा सुसाट्याचा नव्हे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. Weather Forecast

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने जणू तांडवच मांडलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारख्या भागांमध्ये मुसळधार सरी कोसळत असून नागरिकांना अक्षर सागरात कोंडून ठेवले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज देखील जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तर कोकणात समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. घाटमाथ्यावर पावसांच्या सरिनी हजेरी लावली असून पुणे शहरात सकाळपासून ढगाळ वातावर निर्माण झाले आहे. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाच्या सरी बरसत आहेत आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

तर मराठवाड्यात पावसाने डोकं वर काढले, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी हवामानाचा अंदाज आकडे आशाळ भूत नजरेने पाहतोय. तर सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून पाऊस लवकर सुरू झाला तर शेतीचा नियोजनावर परिणाम होऊ शकतो.

विदर्भात देखील पावसाचा आगमन झालंय, मुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी खरीप पूर्व हंगामासाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे. एक पार्श्वभूमी वरती अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघा गर्जना सह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

मागील वर्षी याच काळात विदर्भात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या वर्षी सुरुवातीपासूनच पावसानं हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे पण अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने प्रशासन सज्ज राहणार आहे.

या पावसात खरी चिंता आहे ती शेतकऱ्यांची. नुकसानीची ताजा जखमा भरण्याच्या आत पाऊस पुन्हा एकदा जीव घेईपर्यंत थैमान घालतोय. जनतेने प्रशासनाचा सूचनांचे काटेकोर पालन केल्यास संकटाचे रूपांतर संधीमध्ये होईल. पण तोवर या दोन दिवसात सतर्कता आणि संयम पाळण ही खरी काळाची गरज आहे.

हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!

Leave a Comment

error: Content is protected !!