Weather forecast : पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामान विभागाचे नवीन अंदाज पहा

Weather forecast | राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खातेने वर्तवलेला आहे यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. राज्यामध्ये अचानक सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे भरती हवामान खात्याच्या नवीन अंदाजामध्ये कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आपण ह्या हवामान अंदाज मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा.Weather forecast

राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने, विदर्भात मुसळधार पावसात गारपिटीचा इशारा दिलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विदर्भासोबत भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये देखील पावसाची शक्यता दिलेली आहे यामुळे या भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 30 मार्च रोजी राज्यातील कोल्हापूर पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी धाराशिव बीड सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तर कमल तापमान 36°c तर किमान तापमान 32°c मुंबईमध्ये राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये किमान तापमान कमाल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. खर तर गेल्या काही दिवसांपासून तापमानांमध्ये स्थिरता आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु दुपारनंतर तापमान घट होऊन पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तर पुण्यामध्ये देखील तापमानामध्ये मोठा बदल झाले असल्याचे भरती हवामान खात्याने सांगितले आहे कमल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20°c असे आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे तर पुण्यामध्ये दोन दिवसांमध्ये हलक्या सरी पडतील असा इशारा भारतीय विभागाने दिलेला आहे.

छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील तापमान बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. तापमान 40°c तर किमान तापमान 22°c इतके राहण्याची शक्यता आहे व 30 मार्च म्हणजे आज पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

तर तसेच नागपूरमधील तापमानाचा विचार केला तर येथे तापमान 41 अंश सेल्सिअस किमान तापमान 23 इतके असण्याची शक्यता आहे. दुपारनंतर स्थापना स्थिर राहण्याचे भारतीय विभागाने सांगितले आहे त्यानंतर ढगाळ वातावरण होईल आणि 2 एप्रिल पासून नागपूर मध्ये जोरदार वारे वाहण्याच्या शक्यता आहे तर या सोबत पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

यामुळे राज्यातील हवामानात बदल होणार असल्याने शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आरोग्य सह त्यांच्या जनावरांची व शेतीची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर आपण राज्यातील हवामानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा लेख आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!