Weather Alert : राज्यात हवामान बिघडले, या जिल्ह्यांना मोठा अलर्ट! होणार अवकाळी पाऊस


Weather Alert : सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचा जोरदार आगमन झालेला असून हवामान खात्याने पुन्हा एकदा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे कुठे झाडे पडली तर कोणाचे गुर दगावले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना मोठ्या मदतीची गरज आहे. तर त्यापूर्वीच हवामान खात्याने 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात वातावरण अस्थिर राहणार असलेले चित्र आहे.

या आठ जिल्ह्यांना मोठा धोका

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना हवामान विभागाने मे महिन्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या भागात मुसळधार पावसाचा वादळी वारे आणि विजांचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता असून, अचानक पूर परिस्थिती, झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाला असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी अशी आव्हान करण्यात आलेले आहे.

या 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे देखील हवामान खात्याने पष्ट केला आहे.

मान्सून पूर्व पावसामुळे अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये उगवलेली पिकं सडले आहेत तर शेतकऱ्यांच्या अर्थकारण डगमगलं आहे. याशिवाय काही भागात वादळी वाऱ्यांमुळे झाड विजांच्या तारा कोसळल्याच्या घटना देखील नोंदवण्यात आलेले आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रसंग ही अनेक ठिकाणी घडलेले आहेत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी अशी आवाहन करण्यात आलेले आहे तर राज्यात मान्सूनचा देखील आगमन होणार आहे यामुळे आता आतापासूनच आपल्याला तयारीला सुरुवात करावी लागणार आहे कारण आता खरीप हंगाम सुरू होणाऱ्या आणि त्याची तयारी करावी लागणार आहे.

हे पण वाचा | राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!