Weather Alert: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान (IMD) खात्याने पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन होणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलेला आहे. हवामान खात्याने कोणत्या नवीन जिल्ह्यांना अंदाज दिलेला आहे आणि पुढची कोणती काळजी घ्यायची आहे. याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. Weather Alert
हवामान खात्याच्या नवीन अंदाज मध्ये अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यातून काढता पाय घेतला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने राज्यभर आपली हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे यावेळी फक्त हलकाच नव्हे, तर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस धडकला आहे. यामुळे राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आले आहे. आणि हे सगळं असताना काही भागात मात्र उन्हाचा (Sunstroke) चटका कायम राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. .
राज्यातील या भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड मध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विजांचा कडकडाटात जोरदार पाऊस होणार असून वाऱ्यांचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना Yellow Alert देण्यात आले आहे. Weather Alert
हे पण वाचा| महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवसापासून राज्यात होणार जोरदार पाऊस; बघा काय म्हटले पंजाबराव?
मराठवाड्यामध्ये सावधगिरी बाळगा
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये जरा वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. कुठेही अपेक्षाप्रमाणे पाऊस नाही त्यामुळे शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. परंतु, आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही कारण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जोरदार वाऱ्याची शक्यता असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नव्याने तयार झालेल्या अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाचे चिन्ह आहे. तर विदर्भात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचा हवामान खात्याचे म्हणणं आहे.
हवामान खात्याच्या अपडेट नुसार आपण सविस्तर अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात पाऊस कमी पडणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे. आणि पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.
2 thoughts on “Weather Alert : राज्यातील या 23 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा? वाचा सविस्तर माहिती”