Weather Alert | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे मोठे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट


Weather Alert | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा आपली चांगलीच ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच म्हणजे 25 मे रोजी दमदार एंट्री घेतली, त्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पावसाने आगमन केलेला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागासाठी अति नुसार दार पावसाचा इशारा आणि वादळ वाऱ्यांचा हाय अलर्ट जारी केलेला आहे. Weather Alert

हवामान विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या भागातील मुसळधार पावसाची शक्यता असून, सोबतच वादळी वाऱ्यांचा वेग 45 ते 55 किमी प्रति तास असू शकतो.

त्याचबरोबर राज्यात नुसता पावसाच नाही, तर तुफान वाऱ्यांची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. कोकण किनारपट्टी भागातील लोकांना विशेष काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलेला आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर पाहिला मिळणार आहे. शेतीसाठी हा पाऊस फायद्याचा असला तरी विजेपासून सावध राहण्याची गरज आहे.

तर विदर्भातील नागरिकांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहणार आहे. भंडारा, गोंदिया आणि नागपूर मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विज पडण्याचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे शेतकरी ग्रामीण भागातील लोकांनी खबरदारी घ्यावी.

उत्तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी काम करताना काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास काम थांबवून सुरक्षित स्थळी जावे.

हवामान विभागाच्या सूचनानुसार नागरिकांनी धार बाहेर पडताना मोबाईल चार्ज ठेवावे, विजेपासून लांब राह आणि प्रशासनाच्या इशाराकडे लक्ष ठेवा आणि अशाच हवामान अपडेट साठी महाराष्ट्र बातमी वेबसाईटला फॉलो करत चला.

राज्यामध्ये या तारखेला होणार पावसाची जोरदार बॅटिंग, पंजाबरावांचा मोठा अंदाज

2 thoughts on “Weather Alert | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे मोठे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट”

Leave a Comment

error: Content is protected !!