Weather Alert | महाराष्ट्रात पुढील 48 तासात होणार धो धो पाऊस, हा हवामान अंदाज लक्षात घ्या

Weather Alert | महाराष्ट्रात यंदा मान्सूनने वेळेआधीच एन्ट्री घेतल्यानंतर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीला सुरुवात केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्यामुळे पावसाचा मोठा खंड पडला. आज काही भागांत हलक्याफुलक्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी तापमान पुन्हा वाढू लागलं. परंतु बीडमध्ये दुपारनंतर वातावरणात मोठा बदल झाला आणि मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली, व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर याच पार्श्वभूमी वरती आता हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण १३ जूनपासून पुन्हा एकदा मान्सून (Monsoon Update) राज्यात सक्रिय होणार असून, विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.Weather Alert

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुण्यातील हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला असून, प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच पुणे आणि अहिल्यानगर (Ahmednagar) जिल्ह्यांत देखील पावसाचं प्रमाण वाढणार असल्याने या ठिकाणी अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पावसाचा हा अलर्ट विशेष महत्त्वाचा मानला जातोय. कारण वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू असताना पावसामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सोलापूरमार्गे जाणाऱ्या मार्गांवर विशेषतः पुणे, सातारा भागांत नियोजनपूर्वक तयारी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

या आठवड्याच्या उत्तरार्धात म्हणजे १४ जूननंतर मान्सूनचा जोर अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सल्ला घेऊनच पुढील पावसावर आधारित शेतीचे निर्णय घ्यावेत, असं स्पष्ट केलं आहे. डॉ. सानप यांच्या मते, पेरणी करण्याची घाई टाळावी आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच पुढील पावले उचलावीत.

या पार्श्वभूमीवर, प्रशासन आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कारण अचानक पडणारा पाऊस वाहतूक, शेती, वीज पुरवठा अशा अनेक बाबींवर परिणाम करू शकतो. त्यामुळे पुढील दोन दिवस हवामानाकडे लक्ष ठेवणं अत्यावश्यक ठरणार आहे.

(Disclaimer: हवामान बदलाच्या अपडेटसाठी अधिकृत IMD संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या.)

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबरावांनी दिला शेतकऱ्यांसाठी मोठा अंदाज

1 thought on “Weather Alert | महाराष्ट्रात पुढील 48 तासात होणार धो धो पाऊस, हा हवामान अंदाज लक्षात घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!