Weather Alert : मे महिना सुरू झाला आणि राज्यावरती एक मोठं संकट निर्माण झाल. ते म्हणजे राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याने राज्यात पुन्हा एकदा उष्णता दमट वातावरण आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेला आहे. यामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. परंतु, वाढत्या उष्णतेपासून आता ब्रेक मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून होरपळणाऱ्या महाराष्ट्राला आता मेघराजाचा साक्षात इशारा मिळाला आहे.
पुढील 72 तासात म्हणजे चार ते सहा मे दरम्यान हवामानात मोठा बदल होणार असून, राज्याचे अनेक भागांमध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने थेट ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसात सह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुण्यामध्ये देखील तापमानात मोठ्या प्रमाणात नोंद करण्यात आलेले आहे पुण्यात ४१ अंश असेल तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि उकडलेले वातावरण पश्चिम महाराष्ट्रात कायम राहणार आहे. मात्र, वातावरणात बदलायची चाहूल लागली आहे.
नाशिक, धुळे, अहिल्यानगर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक मध्ये तापमान 40°c पर्यंत पोहोचणार आहे.
लातूर, नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, पण बीड, परभणी, हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि तापलेले वातावरणच राहणार. काही ठिकाणी तापमान 43 अंशापर्यंत पोहोचल आहे..
विदर्भात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाट आणि पावसाचा जोर जाणवेल. वर्धा चंद्रपूर यवतमाळ गोंदिया- या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित विदर्भाला येलो अलर्ट जारी केलेला आहे.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ज्या भागात गारपिट होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी उघड्यावर असलेले पिकांची तातडीने राखण करावी. फळबागा, भाजीपाला किंवा काढण्यासाठी तयार पीक सरक्षित ठिकाणी हलवावं. फवारणी आणि पीक योग्य उपायोजना राबवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात हवामान आपली तंत्र कुठे गारपीट, कुठे विजांचा तांडव, तर कुठे उन्हाचा कहर! पुढील 72 तासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, शेतकरी नागरिक सर्वांनी सतर्क राहणं गरजेचे आहे.
हे पण वाचा | हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा