Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा हवामान ने थैमान घालायला सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कहर, अचानक वादळी वाऱ्याचा तडाका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटे सोबत मुसळधार पावसाचा इशारा देखील वर्तवलेला आहे यामुळे काही भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. Weather Alert
हवामान विभागाच्या ताज्या अपडेट नुसार, 25 एप्रिल पासून 29 एप्रिल पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा हवामान पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण होईल, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडू शकतात असा हवामान अंदाज आला आहे.
विदर्भात गारपीट, कोकणात पावसाची शक्यता!
27 आणि 28 एप्रिल रोजी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांचे योग्य रक्षण करावे. विशेषता: भात, गहू, हरभरा, डाळिंब, केळी यासारख्या पिकांना मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो.
दक्षिण कोकणात 25 एप्रिल रोजी विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेले आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ही हवामान बदल
मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पुढील चार दिवस उष्णतेसह वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, आकाशात विजा चमकणा आणि वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे.
काही महत्त्वाच्या काळजी देखील तुम्हाला घ्यावा लागणार आहे ११ नंतर गरजे शिवाय घराबाहेर पडू नका. कारण, उष्णता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शारीरिक मेहनतीचे काम शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी नंतर करा. भरपूर पाणी प्या, ताज फळ खा. वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. पिकांचा नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांना अच्छादन करावे. विजांच्या कडकडाट वेळी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नका.
महाराष्ट्र मध्ये हवामानात अचानक बदल होत आहे कोणाचा तडाका आणि गारपीटीच वातावरण सध्या तयार झाल्याने अशा दोन्ही टोकांच्या हवामानाने राज्यामध्ये मोठे थैमान घातलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, हवामान विभागाच्या सूचनांचा पालन करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.