Weather Alert : राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर (Maharashtra Batami) आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा राज्याच्या हवामानाबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका वाढणार आहे. त्यासोबत वादळी वारा आणि गारपीटीची देखील वर्तवला आहे. या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Weather Alert
राज्यात पुढील तास धोक्याचे
भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाज मध्ये, स्पष्ट सांगितले आहे की, राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने, विदर्भ मराठवाडा कर्नाटक मध्य महाराष्ट्र तमिळनाडू या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या हवामान बदलामुळे चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. हे चक्रकार वारे समुद्रापासून 900 मीटर उंचीवर सक्रिय आहे. हे वारे हवामान अस्थिरता निर्माण करत आहेत. याच पार्श्वभूमी वरती राज्यात वादळी वारासह गारपिटीचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
खरंतर विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा इशारा आहे. त्यासोबत विजांच्या कडकडाट शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी अशी आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण राहिला असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्या लगतच्या काही भागांमध्ये उष्णतेसह हवामानामध्ये अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
तर सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये 38 अंश सेल्सिअस पुढे तापमान गेलेले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान पोहोचली आहे. अशा परिस्थितीमध्ये उष्णतेचा त्रास आणि पावसामुळे होणाऱ्या समस्या दुहेरी सामना नागरिकांना करावा लागत आहे.
राज्यात हवामान बदल झाले असल्याने शेतकरी बांधवांनी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाची आणि विजांची शक्यता असल्याने, या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकरी बांधवांनी योग्य ठिकाणी राहणे आवश्यक आहे. झाडांचा भांड्यात तुटून पडणे, लाईटीचे पोल पडणे, यामुळे जीवित हानी होऊ शकते. हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करा.
हे पण वाचा | सावधान! राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; IMD नवीन अलर्ट पहा