Weather Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची (Maharashtra Batami) बातमी समोर आलेली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा आणि गारपिटचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमी वरती पुढील 24 तासांमध्ये तीन नवे संकट सध्या महाराष्ट्रावरती निर्माण झालेले आहे. राज्यामध्ये पाऊस, उष्णता आणि दमट वातावरण यासारखे तीन संकट निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकण आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. Weather Alert
या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
IMD च्या ताज्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सोमवारी लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ मध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. या काळामध्ये ताशी 30 ते 40 वेगाने वारे वाहतील. कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्याच्या हवामानात मोठा बदल
खरंतर गेले काही दिवसांपासून राज्याचा हवामानामध्ये मोठा बदल झाल्याच पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवला आहे. ताज्या हवामान अंदाजानुसार, सोमवारी 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रात हवामान समिश्र स्वरूपाचा असेल. राज्यात विविध भागांमध्ये उष्णता आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दमट वातावरणाचा देखील अनुभव येईल.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागामध्ये वारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. यामुळे या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेणे व सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
हवामानातील सतत होणाऱ्या बदलामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावरती मोठा परिणाम मतांना पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन. तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी हवामान अंदाज याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तर भारतीय हवामान खात्याचा नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
(ताज्या हवामान अपडेट साठी महाराष्ट्र बातमी वेबसाईटला फॉलो करत चला)