Voter ID Apllicaltion: घरबसल्या बनवा तुमचे मतदार कार्ड; जाणून घ्या सर्व प्रोसेस..


Voter ID Apllicaltion: मतदान करणे हा लोकशाहीत प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. जो बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं वय 18 वर्षे पूर्ण असेल आणि अजूनही तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची किंवा रांगेत उभा राहण्याची अजिबात गरज भासणार नाही. कारण तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या आणि जलद मार्गाने तुमचे मतदान ओळखपत्र मिळवू शकतात. या लेखात आपण ऑनलाइन मतदान ओळखपत्र कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मतदान ओळखपत्र फक्त मतदानासाठीच नव्हे तर तुमच्या भारतीय नागरिकतत्त्वाचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयुक्त ठरते. हे एक अधिकृत कागदपत्र असून त्याचा वापर अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच पत्त्याचा आणि फोटोच्या ओळखीचा पुरावा म्हणून केला जातो. त्यामुळे हे ओळखपत्र तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा असेल तर तुम्ही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. Voter ID Apllicaltion

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावे लागतील त्याची यादी खालील प्रमाणे आहे. ओळखीचा पुरावा (यापैकी कोणताही एक)

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन
  • पॅन कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • दहावीचे मार्कशीट

पत्त्याचा पुरावा (यापैकी कोणताही एक)

  • विज बिल
  • पाणी बिल
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

हे पण वाचा| सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या 10 ग्राम सोन्याची किंमत

मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम अधिकृत मतदान सेवा पोर्टलवर (www.nvsp.in) जावे लागेल.
  • होम पेजवर तुम्हाला apply online for registration of new voter किंवा form 16 असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. यामध्ये तुमचे नाव जन्मतारीख, राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
  • तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवा.
  • त्यानंतर तुमची ओळख, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर, माहिती अचूक आहे का नाही एकदा तपासून घ्या, आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा ईमेल द्वारे अर्जाची स्थिती पाहायला मिळेल.

मतदान ओळखपत्र हरवले आहे मग काय करावे?

जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवले असेल तर तुम्हाला त्याची परत हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही www.nvsp.in या वेबसाईटला भेट देऊन तुमचं डिजिटल मतदान ओळखपत्र अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकता. तुम्हाला ही सुविधा अगदी मोफत उपलब्ध आहे. त्याचबरोबर नवीन मतदान तयार करण्यासाठी देखील कोणताही शुल्क घेतला जात नाही. त्यामुळे आता प्रतीक्षा न करता जर तुम्ही अजूनही मतदान ओळखपत्र तयार केले नसेल तर आजच ऑनलाईन अर्ज करा आणि लोकशाहीच्या हक्काचे पालन करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Voter ID Apllicaltion: घरबसल्या बनवा तुमचे मतदार कार्ड; जाणून घ्या सर्व प्रोसेस..”

Leave a Comment

error: Content is protected !!