Vivo V50 Launch date : मोबाईल प्रेमी साठी एक महत्त्वाची आणि आनंदाची एक बातमी समोर आलेली आहे. Vivo ने अलीकडेच आपला एक हाय-एंड X200 सिरीजचे भारतात अनावरण केल्यानंतर आता कंपनी आपल्या लोकप्रिय V-सिरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारी मध्ये आहे. ViVo V50 सिरीज लवकरच बाजारामध्ये दाखल होणार आहे याची माहिती आता सोशल मीडियावरती वायरल होत आहे. Vivo V50 Launch date
Vivo ने नुकतेच आपल्या नवी स्मार्टफोनचा सिजर शेअर केलेला आहे. यामध्ये त्यांनी हा फोन Zeiss-समर्थित ऑप्टिक्ससह येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच, कंपनीने या फोनसाठी तुमच्या आठवणी कायमस्वरूपी कॅप्चर करण्यासाठी लवकरच येताय असे वर्णन देखील केलेले आहे. यामुळे स्मार्टफोन प्रेमी साठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे आणि ग्राहकांसाठी एक आतुरता लागून राहिली आहे.
Vivo V50 भारतामध्ये कधी होणार लॉन्च?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, विवो कडून अद्याप अधिकृत लॉन्चिंग डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये, प्रोमोशनल पोस्ट नुसार हा फोन 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असली, तरी या तारखेला फोन सादर केला जाईल असे तज्ञांचे मत आहे.
Vivo V50 चे डिझाईन आणि फीचर्स बाबत महत्त्वाची माहिती
लिक झालेल्या रेंडर्स व टिझर मधून Vivo V50 च्या डिझाईन बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेले आहेत. या स्मार्टफोनमध्ये वर्क- एज डिस्प्ले आणि मध्यभागी पंच होल कॅमेरा असल्याची शक्यता आहे. तसेच, लीक झालेल्या इमेजमध्ये हा फोन आकर्षक गुलाबी लाल रंगांमध्ये दिसून आलेला आहे.
विशेष म्हणजे, Vivo V50 pro या मॉडेल बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावेळी व्हेरियंट लॉन्च केलं जाईल की नाही हे याबाबतीत सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Vivo V50 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Vivo V50 मध्ये 6.7 उंचाचा क्वाड -कहर्वड AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करू शकतो.
- प्रोसेसर : या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 7Gen 3 processor दिले जाणार आहे. जो शक्तिशाली परफॉर्मन्स देऊ शकतो.
- ऑपरेटिंग सिस्टम : हा फोन अँड्रॉइड 15 आधारित Funtouch OS वर चालणार आहे.
- कॅमेरा सेटअप : Vivo V50 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये 50MP +50MP चे दोन कॅमेरा असतील. यामुळे फोटोग्राफीच्या अनुभवात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग : या फोनमध्ये 6,00mAh ची मोठी बॅटरी आणि 90w फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
Vivo V50 ची भारतात किंमत किती असणार?
प्रसिद्ध टीपस्टर अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, Vivo V50 चा बेस व्हेरिएंट सुमारे ₹37,900 रुपयांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी Vivo V50 ची किंमत ₹40,000 रुपयांपेक्षा अधिक ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुलना केली असता, Vivo V40 भारतामध्ये 34,999 रुपयांना लॉन्च करण्यात आलेला होता. त्यामुळे Vivo V50 किंचित महागड्या किमतीत सादर केला जाऊ शकतो.
निष्कर्ष
Vivo V50 हा प्रीमियम मिड रेंज कोण असणार आहे यामध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी सह बाजारामध्ये येणार आहे. या फोनची अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व लेख माहितीवर सावधगिरी ने विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच लवकरच Vivo कडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हि संधी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. आणि Vivo V50 हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
5 thoughts on “Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल”