Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहात पकडण्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पतीचा संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसतात. माझे पाच वर्षे वाया घालवलीस तू! असे म्हणत तो पत्नीवर ओरडताना दिसतो. ही घटना नेमकी कुठे घडली हे अजून पोस्ट झालेले नाही परंतु हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Viral Video
मिळालेल्या माहितीनुसार पतीला गेल्या काही दिवसापासून आपल्या पत्नीच्या वागणुकीबद्दल संशय येत होता. मोबाईलवर जास्त वेळ घालवणे, अचानक घराबाहेर पडणे आणि रात्री अपरात्री फोनवर बोलणे अशा अनेक गोष्टी त्याच्या निदर्शनात आल्या होत्या. त्यामुळे त्याने पत्नीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस पतीने आपल्या पत्नीचा पाठलाग केला आणि तिला एका हॉटेल जवळ दुसऱ्या पुरुषासोबत भेटताना पाहिले. हे दृश्य पाहताच पतीचा राग अनावर झाला आणि त्याने तात्काळ घटनास्थळी जाऊन पत्नीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पती मोठ्याने ओरडत आहे. तू माझं आयुष्य बरबाद केलं पाच वर्ष मी तुला समजून घेतलं प्रेम दिलं.. आणि तू हे केलस? असं का केलंस? त्याचा भावनिक आवाज अनेकांच्या हृदयाला भिडणारा आहे. पतीने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला लोकांसमोर उघड केल्याने या घटनेने समाजात आणखीन मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशा अनेक घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. मात्र ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. दरम्यान काही लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ शूट केला तर काहींनी घटनेचे थेट सोशल मीडियावर प्रक्षेपण केले. यामुळे या प्रकरणाला अधिक प्रसिद्धी मिळाली. हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आलेला आहे.
Disclaimer: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. याची पडताळणी झालेली नाही. आम्ही फक्त माहिती म्हणून तुम्हाला याबद्दल स्पष्टीकरण देत आहोत. आम्ही याबद्दल कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत. हा व्हिडिओ योग्य की अयोग्य याबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.