Viral Video: उत्तर प्रदेश मधील अजमगड येथून समोर आलेली एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. एका दिव्यांग व्यक्तीला अशोक राम यांना आपल्या आजारी पत्नीला पाठीवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जावा लागलं. या मागचं कारण होतं त्यांच्या घरापासून अवघ्या तीच मीटर अंतरावर रस्ता उपलब्ध नसणे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
अशोक राम यांच्या घरातून मुख्य रस्त्यापर्यंत फक्त 30 मीटर अंतर आहे. पण याच छोट्या अंतरात खाजगी जमिनीच्या वादामुळे रस्ता अडवला गेला आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की अशोक ज्या अरुंद पायवाटेने ये जा करतात तिथे सामान्य माणसालाही चलन कठीण होत आहे. मग दिव्यांग व्यक्तीसाठी ती किती कठीण असेल याची कल्पना करता येत नाही. अनेक दिवसापासून अशोक राम हे रस्ता मिळावा यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत होते. पण त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
अशोकराव यांनी आपला संता व्यक्त करताना गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सुरुवातीला रस्त्यासाठी परवानगी दिली गेली होती, त्यासाठी पैसेही घेतले जातात आणि नंतर अचानक ती परवानगी रद्द केली जाते. यामुळेच त्यांना इतक्या त्रासदायक परिस्थितीत आपल्या पत्नीला पाठीवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले. त्यांची ही वेदनादाय परिस्थिती कॅमेरात घेत झाली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येतात वेगाने वायरल झाला. Viral Video
हा रदयाला कोलमडून टाकणारा प्रसंग प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली. तातडीने महसूल विभागाने टीम अशोक राम यांच्या गावात पोचवली आणि त्यांना लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सर्व घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे कसं दुर्लक्ष केलं जातं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. एका वायरल व्हिडिओमुळे प्रशासनावर दबाव आला आणि त्यांनी कारवाई केली ही दुर्दैवी घटना आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक चांगल्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.