महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत धावणार! असा आहे मार्ग, जाणून घ्या सविस्तर माहिती

Vande Bharat Railway News : राज्यातील रेल्वे प्रवासांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असून, आता नांदेड हुन थेट मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या नऊ तासात शक्य होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 26 ऑगस्ट पासून धावण्यास सुरुवात करणार असून, राज्यातील एकूण 7 जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. यामध्ये परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. Vande Bharat Railway News

ही सेवा 24 ऑगस्ट 2025 रोजी विशेष उद्घाटन गाडी धावणार आहे. 27 ऑगस्ट पासून CSMT मुंबईहून नांदेड कडे वंदे भारत सुरू करण्यात येईल. 28 ऑगस्ट पासून नांदेड हुन मुंबईकडे ही सेवा सुरू करण्यात येईल.

वेळापत्रक जाणून घ्या

मुंबई ते नांदेड (CSMT-Hazur Sahib Nanded) रोज दुपारी 1:10 वाजता मुंबई CSMT हून सुटेल (गुरुवार वगळता) पुढील थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी रात्री 10:50 वाजता नांदेडला पोहोचेल. प्रवासाचा एकूण कालावधी: 9 तास 25 मिनिटे, नांदेड ते मुंबई (Hazur Sahib Nanded -CSMT) रोज सकाळी 5:00 वाजता नांदेडहून सुटेल (बुधवार वगळता) पुढील थांबे : परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर, दुपारी 2:25 वाजता CSMT मुंबईला पोहोचेल

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

ही वंदे भारत एक्स्प्रेस खालील 10 स्टेशनांवर थांबणार आहे : परभणी,जालन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई CSMT

तसेच अद्याप अधिकृत घोषणा झाली नसले तरी माध्यमांच्या माहितीनुसार तिकीटाचा दर AC चेअर कार ₹1750 राहू शकतो तर एक्झिक्यूटिव्ह चेअर कार ₹3300 थोडसं महाग पण अधिक आरामदायी यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास तिन्ही गोष्टीवर वाचणार आहे अशा माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला……

हे पण वाचा | राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा! शाळांनाही सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

Leave a Comment

error: Content is protected !!