UPI Transaction: फोन पे, गुगल पे वापरताय? मग 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारावर किती शुल्क द्यावा लागणार? जाणून घ्या सविस्तर


UPI Transaction: आजकाल प्रत्येक जागेवर डिजिटल व्यवहार केला जातो. दरम्यान डिजिटल पेमेंटच्या बाबतीत एक मोठा बदल होत आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. सध्या तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा इतर यूपीआय ॲप्स वापरत असाल आणि मोफत यूपीआय व्यवहार करत असाल. मात्र देशातील एक मोठी खाजगी ICICI बँकेने एक ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात शुल्क द्यावा लागणार आहे. डिजिटल पेमेंटच्या भविष्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही देखील ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला देखील डिजिटल पेमेंटच्या बदल्यात शुल्क द्यावा लागेल. ICICI बँकेने हे शुल्क पेमेंट ऑग्रीगेटर्सकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेमेंट ऑग्रीगेटर्स म्हणजे अशा कंपन्या ज्या अनेक व्यापाऱ्यांकडून डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी तंत्रज्ञान पुरवतात. उदाहरणार्थ, फोन पे पेटीएम गुगल पे आणि रेझर पे यासारख्या ॲप्स पेमेंट ऑग्रीगेटर्स म्हणून ओळखले जातात. ICICI बँकेने प्रत्येक यूपीआय व्यवहारावर 0.02% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जर तुम्ही दहा हजार रुपयाचा व्यवहार केला तर तुम्हाला दोन रुपये शुल्क द्यावे लागेल. या शुल्कची कमाल मर्यादा सहा रुपये ठेवण्यात आली आहे.

हे पण वाचा| गॅस सिलेंडर धारकांसाठी गुड न्यूज! इतक्या रुपयांनी गॅस सिलेंडर झाले स्वस्त; नवीन दर जाणून घ्या

जर एखाद्या पेमेंट ॲग्रीकेटर्स चे खाते आयसीआयसीआय बँकेत नसेल तर त्यांना 0.04% शुल्क भरावा लागणार आहे. ज्याची कमाल मर्यादा दहा रुपये असणार आहे. जर तुम्ही सामान्य ग्राहक म्हणून यूपीआय वापरत असाल, तर घाबरू नका कारण सध्या तुमच्याकडे यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत राहणार आहे. हे शुल्क फक्त पेमेंट ॲग्रीकेटर्स वर लागू होत आहेत. आणि हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाणार नाहीत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी सध्यातरी ग्राहकांसाठी युपीआय मोफत ठेवले आहे.

भविष्यात हा निर्णय फक्त आयसीआयसीआय बँकेपुरता मर्यादित राहणार नाही. यापूर्वी येस बँक आणि ॲक्सिस बँकेने ही अशाच प्रकारचे शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. बँकांनी हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे युपीआय व्यवहारावर होणारा तांत्रिक आणि ऑपरेशनल खर्च वाढत आहे. जर देशातील सर्व मोठ्या बँकांनी असे शुल्क आकारायला सुरुवात केली तर पेमेंट ॲग्रीकेटर्सवरील खर्च वाढेल. सुरुवातीला पेमेंट ॲग्रीकेटर्स हा खर्च स्वतः सहन करतील पण भविष्यात हा खर्च व्यापारी किंवा ग्राहकांवर लादला जाऊ शकतो.

एकंदरीत ICICI बँकेचा हा निर्णय सध्या तरी ग्राहकांसाठी चिंतेचा विषय नाही. पण डिजिटल पेमेंटच्या भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा बदल आहे. सरकार आणि आरबीआय यावर लक्ष ठेवून राहणार आहेत. भविष्यात डिजिटल व्यवहाराचे नियम कसे बदलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे यूपीआय वापरताना येणाऱ्या काळात होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे. UPI Transaction

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “UPI Transaction: फोन पे, गुगल पे वापरताय? मग 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारावर किती शुल्क द्यावा लागणार? जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!