UPI New Rules : आपण सगळे डिजिटल युगामध्ये जगत आहोत, आणि व्यवहार पण डिजिटल झालेले आहेत. कुठे आपण काही खरेदी केलं तर आपण कॅश व्यवहार करत नाही ऑनलाईन व्यवहार करत आहोत. कुठे भाजी घ्यायची असो, किराणा घ्यायचा असो, किंवा चार मित्रांना चहा पाजायचा असो, प्रत्येक गोष्टीसाठी एकच वाक्य ऐकायला मिळतं “Google pay करा भाऊ!” कारण UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस आजच्या काळात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा हातात आले डिजिटल पाकीट.
पण आता या UPI मध्ये काही मोठे बदल होणार आहेत आणि हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले नाहीत, तर कुणी दुसऱ्याच्या नावावर पैसे पाठविले आणि तुमचा मोबाईल मध्ये ‘Transaction successful’ असा मेसेज येईल पण तुमचे पैसे कुठे गेले ते तुम्हाला समजणारच नाही. त्यामुळे ही बातमी नक्की वाचा. UPI New Rules
NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया यांनी काही नवीन नियम जाहीर केलेले आहेत. 30 जून 2025 पासून हे नियम लागू होतील आणि काही बदल एक ऑगस्टपासून होणार आहेत. यमक चा उद्देश आहे फसवणुकीपासून थांबवणे, गोपनीयता वाढवणे, आणि UPI व्यवहार अधिक सुरक्षित बनवणे.
30 जून पासून टोपणनाव गायब!
आतापर्यंत जेव्हा तुम्ही कोणालातरी पाठवत असता तेव्हा मोबाईल मध्ये सेव केलेला नाव किंवा एखादं टोपण नाव स्क्रीनवर दिसायचं. उदाहरणार्थ, शिवा भाजीवाला किंवा संदीप किराणा असं. पण त्याच नावाखाली दुसऱ्याच व्यक्तीचा QR कोड स्कॅन झाल्यावर फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे NPCI ने ठरवलं आहे की, आता फक्त बँकेत रजिस्टर केलेलं खरं नाव दिसेल. म्हणजे शिवा भाजीवाला नाही तर शिवाजी पाटील असं नावच मोबाईलवर दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवता तोच खरा आहे का हे लगेच समजणार आहे.
1 ऑगस्ट पासून दिवसातून 50 वेळा बॅलन्स तपासायला मिळणार
हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जे लोक दिवसभरातून कधीही कितीही वेळा बॅलन्स चेक करतात. पण त्यामुळे बँकेच्या सर्वर वर ताण येतो, आणि कधी कधी संपूर्ण UPI सिस्टीम स्लो होते. म्हणून आता एक ऑगस्टपासून यूपीआय बॅलन्स दिवसातून फक्त पन्नास वेळात चेक करता येणार आहे. म्हणजे उगाचच प्रत्येक दहा मिनिटांनी पैसे आहेत का बघू? असं करता येणार नाही. पण काळजी करू नका, कारण प्रत्येक व्यवहारानंतर बँक तुम्हाला तुमचं बॅलन्स मेसेज द्वारे सांगणार आहे. .
AutoPay सुविधाही वेळेवर मर्यादित!
नेटफिक्स, ॲमेझॉन प्राईम, SIP, किंवा विमा हप्ते यांसाठीचे दर महिन्याचे ऑटोडिबिट सेट केले जातात, ती आता फक्त ठराविक वेळेतच चालतील. म्हणजे सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री 9.30 या वेळेतच हे पेमेंट प्रोसेस होणार आहे. म्हणजे मध्यरात्री नेटफ्लेक्स चे पैसे गेले आणि नेटवर्क इरर असं काही आता होणार नाही.
जर एखाद्या बँकेने किंवा UPI ॲप्स्नेही नियम पाळले नाही, तर NPCI त्यांच्यावर थेट कारवाई करणार आहे. API ब्लॉकिंग, दंड, आणि नवीन ग्राहक जोडायला बंदी सुद्धा येऊ शकते. यासाठी सगळ्या बँका व पेमेंट ॲप्स यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत हमीपत्र द्यायचा आहे.
आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली की, कशाप्रकारे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी नियम लागू झालेले आहेत. सर्वसामान्यांनी हे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि पुढील माहितीसाठी किंवा अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | 1 जुन पासून बँकांना हा नवीन नियम होणार लागू! सर्वसामान्यांना भरावा लागणार अतिरिक्त पैसे?