राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आव्हान


Unseasonal rain warning : खरंतर, राज्यात मे महिना सुरू झाल्यापासूनच अवकाळी पावसाची सावट राज्यावरती आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी एक महिना आधीच कालावधी लागत असतो परंतु पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कामे खोळंबले आहेत. आता मान्सून देखील जवळ आलेला आहे आणि अवकाळी पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळला आहे.

पुढील पेरणीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी योग्य वेळ न मिळाल्याने आणि मशागत न वेळेवर झाल्याने पेरणी खोळंबणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खाते आणि राज्यातील सात जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झालेली आहे. Unseasonal rain warning

हवामान खातेने राज्यात सात जिल्ह्यांना गारपिटीचा थेट इशारा तर त्याला जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्या गरजेचे आहे कोणत्या जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या जिल्ह्यांना खबरदारी घेण्याचा इशारा!

हवामान खात्याने दिलेला ताज्या अपडेट नुसार, सातारा पुणे, रायगड, कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, सांगली, अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे यामुळे हवामान खात्याचा हा इशारा विशेष लक्ष देण्यासारखे आहे आणि काळजी घेण्यासारखा आहे.

या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका!

आजचा दिवस नाशिक, सातारा, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, नाशिक घाट, सातारा घाट आणि तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे फळपिक, भाजीपाला, हरभरा, द्राक्ष, केळी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवांनी काढणी पात्र पीक तात्काळ साठवाव आणि ओलीत क्षेत्रातील पीक सुरक्षित करावा असा सल्ला दिलेला आहे.

विदर्भ मराठवाड्यात काय परिस्थिती?

विदर्भ आणि मराठवाडा बाबत बोलायचे झाल्यास, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्‍यता असून काही भागात आधीच वीरांचा कडकडाट व पावसाने हजेरी लावली आहे यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून या भागात कोणाच्या उष्णतेपासून दिलासा मिळालाय.

हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, विजेंच्या कडकडाट उघड्यावर काम करणे टाळावं. उंच झाडांपासून व खांबांपासून दूर राहा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. शाळा कॉलेजेस सुरू असतील तर विद्यार्थ्यांना सुरक्षित आसरा मेळावा याची खबरदारी घ्या.

हे पण वाचा | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्‍यता, IMD ने या जिल्ह्यांना दिला अलर्ट  

Leave a Comment

error: Content is protected !!