राज्यात अवकाळी पावसाचा कहर, अनेक ठिकाणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


Unseasonal Rain Alert: मे महिना म्हटलं की अंगाची लाहीलाही करणाऱ्या उनाने त्रासलेले नागरिक, नाका तोंडात गरम वाऱ्यांचे फटके, अन शेतात रखरखीत माळरान असं चित्र दरवर्षी दिसतं. पण यंदा चित्र पूर्णपणे उलटले. महाराष्ट्रात कोणाच्या ऐवजी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वाऱ्यांचा जबरदस्त वेगाने मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. शेतातील नुकसान तर विचारायलाच नको.शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे व्हायला गेला आहे. उगवलेला कांदा, अर्धवट तयार झालेला भात, सगळं वाहून गेलं, सडून गेलं. अमरावती पासून बीड पर्यंत अनुदानाशी पासून साताऱ्यापर्यंत शेतात पाणीच पाणी. मे महिन्याची पावसाची दहशत का माजली, हे समजून घेण्यात तितकाच महत्वाचा आहे.Unseasonal Rain Alert

मागील दोन महिन्यापासून राज्यात मुसळधार पावसाने आपला घर दाखवायला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये बुधवारी रात्री इतका पाऊस झाला आहे की एकाच रात्रीमध्ये 54 ठिकाणी झाडं कोसळली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी अंधारात झाडे हटवली, रस्ते खुले केले. या पावसामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबई उपनगरात बोरवली, कांदिवली, अंधेरी सारख्या भागात रात्री उशिरापर्यंत विजांचा तांडव अन पावसाच्या सरी पडत होत्या. गुरुवारी सकाळी आकाश ढगाळ आणि वातावरणात गारठपणा पाहायला मिळत होता.

या जिल्ह्यांना इशारा

हवामान खात्याने, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर पावसाचा संकट तात्पुरत थांबलेलं नाही. पुढील दोन दिवसांमध्ये देखील पाऊस टिकून राहणार असल्याचे मत व्यक्त केलेला आहे. वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किमी असण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, ढगफुटी सारखी परिस्थिती आणि अचानक वाऱ्यांची गडगडाट यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

पण सगळ्यात मोठा फटका बसलाय तो शेतकऱ्यांना. धाराशिव मध्ये कांद्याची शेकडो पोती शेतामध्ये सडले. बीडमध्ये कांद्याचे मळेच चिखलात गेले. शेतकऱ्यांनी आकाशाकडे पाहून दिलं सरकारने आमचा काही केलं नाही तर चालेल, पण आता देव तरी उभारी देईल का? अमरावतीत मध्यरात्री पावसाची सततधार होती. संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचलं. महानगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापनेची पोलखोल झाली. नाल्यातून सांडलेलं पाणी घरात घुसल.

या सगळ्या मागचं कारण शोधायचं म्हटलं, तर त्याची सुरुवात होते अरबी समुद्रातून. गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा क्षेत्र तयार झाला आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती आधीच बदलू लागली आहे. यंदा मान्सून अंदमान निकोबार मध्ये वेळेपेक्षा लवकर दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील प्रेमान्सून पावसाने अन्य अपेक्षित रित्या लवकर एन्ट्री घेतली आहे. साधारण जून च्या पहिल्या आठवड्यात जे वातावरण तयार होतं, ते यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सुरू झाले.

हा बदललेला हवामान चक्र म्हणजे हवामानातील स्थिरता उघडल्याचा मोठा लक्षण आहे. ग्रामीण भागात तर लोक आता थेट असं म्हणत आहे की, “कधी अवकाळी, कधी वळवी, तर कधी ढगफुटी आमचं बियाणं, आमची माती, सगळ्या ढवळ्या निसर्गाच्या उपमावर चालते”.

शेतीचा नुकसान, शहरात झाडांची पडझड, विजन चा गोंधळ आणि नागरिकांची भांबवलेली अवस्था हे सर्व एकाच वेळी महाराष्ट्रात घडतंय, आणि पावसाचे हे असं रूप मे महिन्यात पान दुर्मिळ तर आहेच, पण धोकादायक आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या इशारांकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्यावी.

हे पण वाचा| भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!