Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा आणि दमट हवामानाने नागरिक त्रस्त झालेल्या आहेत परंतु महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आता मोठा बदल झाल्याचा दिसून येत आहे. आणि मान्सून देखील उंबरठ्यावरती येऊन ठेपला आहे. लवकरात मान्सूनचा पाऊस देखील राज्यात सुरू होईल परंतु त्यापूर्वी राज्यात एक मोठा संकट निर्माण झालेला आहे. म्हणजे अवकाळी संकट हे अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्वी शेतीची मशागत खोळंबली आहे. Unseasonal Rain
मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत वादळी वारे वाहण्याची आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने या साठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल आहे.
मुंबईत जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
मुंबईत आज 17 मे रोजी फ्री मान्सून सहदृश्य वातावरण निर्माण झालेले आहे. हलक्या पावसापासून ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडू शकतो. वादळवार यांचा वेग 40 ते 50 किमी प्रति तासपर्यंत पोहोचू शकतो. ढगांचा गडगडाट, विजा आणि आकाशात अंदुकतेचा अनुभव मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्ह असली तरी वाऱ्यांच्या झोतामुळे झाड होडींग आणि विजांच्या तारा यांच्यापासून सावध राहा मागे देखील असेच आले या अवकाळी पावसाने मोठी जीवितहानी केली होती. शहरामध्ये काही ठिकाणी होल्डिंग पडल्याने अनेक लोकांचा मृत्यू देखील झाला होता.
नवी मुंबई – ढगाळ हवामान, मात्र पावसाची शक्यता कमी
नवी मुंबईत आज आकाश अशांत ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28°c राहणार आहे. हवामानात दमटपणा कायम राहणार असला तरी पावसाची शक्यता फारशी नाही. नागरिकांनी उनाच्या लाटांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी.
सतर्क रहा वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता
मुंबई सहसंपूर्ण कोकणामध्ये वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी ओल्या भिंतीपासून विजनच्या खांबापासून दूर राहावं. समुद्रकिनाऱ्यांवर जाणं टाळावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा.
हवामान विभागांच्या मते, हा बदल प्रीमान्सून पावसाची चाहूल आहे. पुढील काही दिवसांमध्ये असाच प्रकारचे वातावरण बदल होत राहील आणि याच पार्श्वभूमी वरती पुढील आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाची अधिक तीव्रता वाढू शकते.
हे पण वाचा:पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज