Union Bank Wellness Fd Scheme : गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक योजना घेऊन आलो, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकणार आहात. सध्या गुंतवणूक करायचे म्हणल्या नंतर आपल्या सर्वात प्रथम चित्र उभा राहत म्हणजे शेअर मार्केट यामध्ये आपण गुंतवणूक करू आणि चांगला नफा कमव परंतु यामध्ये फक्त नफा नाहीतर तोट्याचा देखील प्रश्न उपस्थित असतो. शेअर मार्केट हे अभ्यासावरती आणि दैनंदिन घडामोडी वरती कार्य करत. यामध्ये गुंतवणूक करायचे म्हटल्यावर मोठ्या जोखमीचं काम असतं. परंतु तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की बँक देखील काही अशा FD योजना सुरू करत आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. यामध्ये गुंतवणूक कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं. आज आम्ही याचीच माहिती घेऊन आलो आहोत.Union Bank Wellness Fd Scheme
सध्या बाजारामध्ये विविध बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजना सुरू आहेत परंतु युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण स्कीम सादर केली आहे. युनियन वेलनेस डिपॉझिट स्कीम. (Union Wellness Deposit Scheme) ही केवळ योजना आर्थिक गुंतवणुकी मूर्ती मर्यादित नसून, ती आरोग्याच्या सुरक्षेची हमी देते. त्यामुळे वृद्ध नागरिकांसह इतर गुंतूनगारांमध्ये या स्कीम बाबत चांगली चर्चा सुरू आहे.
375 दिवसांची स्पेशल FD त्यात हेल्थ इन्शुरन्सचं कवच
युनियन वेलनेस डिपॉझिट ही 375 दिशांची फिक्स डिपॉझिट योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना फिक्स डिपॉझिट वरील व्याज बरोबर हेल्थ इन्शुरन्स कव्हर देखील मिळतोय. ही स्कीम खास करून 18 ते 75 वयोगटातील नागरिकांसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम दहा लाख रुपये असून कमाल मर्यादा तीन कोटी रुपये आहे.
आकर्षक व्याजदर
या FD सध्या 6.75% वार्षिक व्याज दिलं जातंय. विशेष म्हणजे, वयोवृद्ध गुंतवणूकदारांना या योजनेत 0.50% अधिक व्याज मिळणार आहे, ज्यामध्ये त्यांचा व्याजदर थेट 7.25% पर्यंत पोहोचतो. त्यामुळे निवृत्तीनंतर सुरक्षित आणि व्याजासह आरोग्य सुरक्षा लाभ मिळून इच्छिणाऱ्यांना नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
आरोग्य विमा आणि खास बेनिफिट्स
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत सुपर टॉप ॲप हेल्थ इन्शुरन्स मिळतो. त्यात कॅशलेस हॉस्पिटल लायझेशन सुविधा उपलब्ध आहे. शिवाय Rupay Select डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना शॉपिंग, डायनिंग, फिटनेस अशा क्षेत्रांमध्ये लाइफस्टाईल बेनिफिट देखील मिळतात. म्हणजे ही fd योजना गुंतवणूक सोबत तुमचा आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याकडे देखील लक्ष देत आहे.
प्रीमियर क्लोजर आणि कर्ज सुविधा उपलब्ध
या Fd स्कीम मध्ये वेळेपूर्वी FD बंद करण्याची मुभा असून, आवश्यकतेनुसार FD वर कर्ज घेण्याची सुविधा ही आहे. यामुळे एखाद्या आकसमिक गरजेला सामोरे जाताना देखील FD उपयोगी ठरते.
काही अटी आणि मर्यादा
- NRI ग्राहकांना या स्कीमचा लाभ मिळणार नाही.
- जॉईंट अकाउंट असलेला नाही केवळ प्रायमरी अकाउंट होल्डरलाच विमा कव्हर मिळेल.
- ही विमा सुविधा एकदाच मिळते; FD रिन्यू केल्यास नव्याने विमा दिला जाणार नाही.
- विमा कव्हर केवळ मूळ मॅच्युरिटी डेट पर्यंत वैद्य राहतो.
- खाते उघडताना नोमिनीचं नाव अनिवार्य आहे, कारण विमा कव्हर FD शी लिंक केलेला असतं.
आजच्या काळात फक्त आर्थिक सुरक्षा पुरेशी नाही, तर आरोग्याचे कवच ही तितकंच महत्त्वाच आहे. युनियन बँकेची ही स्कीम दोन्ही बाबतीत तुमचे भविष्य सुरक्षित करते. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना एकदा तरी FD योजनेचा विचार नक्की करावा.
(Disclaimer : बँकेचे धोरणामध्ये बदल होऊ शकतो. Fd सुरू करण्यापूर्वी युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा शाखेत जाऊन संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे)
हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती