Tur Market News : उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या तुरीच्या दरामध्ये मोठा चढउतार पहिल्या मिळत आहे. तुरीचे दर 7000 ते 7300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव 7550 रुपये प्रति क्विंटल आहेत. दर पाहिला गेले तर दर हमीभावापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, मार्चनंतर तुरीच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचा म्हटले आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Tur Market News
सरकारचे आश्वासन आणि बाजारातील अपेक्षा
खरे तर यंदा तू उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. बाजार भाव खूप कमी असल्याने शेतकरी वर्ग मधून शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने मोठी संतपाची लाट पसरलेली आहे. तसेच तुरीच्या बाजारातील आवक जशी जशी कमी होईल तशी तशी दरामध्ये वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ञांनी वर्तवली आहे. बाजार तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चनंतर तुरीचा भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पोहोचू शकतात. पुढील काही महिन्यामध्ये बाजार भाव वाढवून 8500 ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा
तुरीचे दर घसरण्या मागचे कारणे
देशभरामध्ये तुरीच्या उत्पादनात सुमारे 14% वाढ झालेली आहे. यंदा पावसाचे प्रमाण अनुकूल राहिल्यामुळे उत्पादन ही जास्त झालेली आहे. परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणात नव्याने तुरीची आवक सुरू आहे. ज्याचा थेट परिणाम दरांवरती झालेला पहिला मिळत आहे.
सरकारने तुरीच्या शुल्कमुक्त आयात धोरणाला मुदत वाढ दिलेली आहे. यामुळे 2024 मध्ये जवळपास 12 लाख टन तूर आयात झालेली आहे. येत्या काही महिन्यात आणखी मोठ्या प्रमाणावर तूर आयात होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम देशातील स्थानिक बाजारांवरती होताना पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
सध्या तुरीचा बाजार भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. परंतु सरकारने संपूर्ण तूर हमीभावाने खरेदी करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवण्याची गरज आहे. तुरीच्या मागणी मध्ये पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशांतर्गत साठा मर्यादित आहे आणि मागील हंगामात उत्पादन कमी झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर तूर साठवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पादन वाढले असले तरी बाजार भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकरी बांधवांनी सध्याच्या परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे. बाजारातील परिस्थिती सतत बदलत असते. त्यामुळे दरांवरचा दबाव आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन योग्य वेळी तुर विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.