Tur Bajar Bhav : आज बाजार भावा बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक थोडीशी कमी झाली असली तरी भाव मात्र चांगला मिळालाय. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती थोडे समाधान कारक वातावरण पाहायला मिळत आहे काही बाजार समितीमध्ये ₹7000 रुपयांच्या वर तुरीचे दर गेले आहेत यामुळे शेतकरी देखील आनंदी झालेले आहेत चला तर जाणून घेऊया आजचे नवीन बाजार भाव. Tur Bajar Bhav
आजची तुरीची स्थिती काय?
आज बाजार मध्ये एकूण 11,611 क्विंटल आवक झालेली आहे तर सरासरी दर येथे 6310 रुपये प्रति क्विंटल इतका भेटला आहे आणि सर्वाधिक दर हा हिंगणघाट बाजार समितीमध्ये 7,060 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वात कमी दर किल्ले धारूर फक्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे हा दर लोकल तुरीला मिळाला असल्याचं म्हणणं आहे.
कोणत्या बाजारात चांगले दर मिळाले ?
हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला 7,060 रुपये सर्वाधिक दर मिळाला आहे तर अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला 6,985 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर लातूरमध्ये लातूरला 6900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जालना येथे पांढरी तुर ला 6825 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर मलकापूर येथे लाल तुरीला 6785 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
कोणत्या बाजार समितीमध्ये कमी दर मिळाले
किल्ले धारूर येथे केवळ तीन हजार ते पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण दर मिळाला आहे. तर पाचोरा बाजार समितीमध्ये सरासरी 5700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर चिखलीमध्ये 6050 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे गंगाखेड बाजार समितीमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर तुरीला मिळाला आहे.
राज्यात पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी नवीन पेरणी सुरू केलेले आहेत त्यामुळे जुन्या तुरीची आवक थोडी कमी झालेली दिसते मात्र हिंगणघाट अकोला लातूर यासारख्या बाजारात मागणी टिकून आहे. व्यापारी भाव चांगले देत आहेत त्यामुळे अनेक बाजारामध्ये तुरीचे दर 6,000 ते 7000 रुपये दरम्यान पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा | Tur Bajar Bhav: तुर बाजारात आवक घटली! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तुरीचे दर काय आहेत?