Tractor Anudan Yojana : फक्त 35 हजार रुपयांमध्ये मिळणार ट्रॅक्टर, सरकार देतय 90% अनुदान, असा करा अर्ज

Tractor Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (Tractor Anudan Yojana,2025) ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि शेती उपयुक्त अवजारे दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्दिष्ट लहान शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आधुनिक शेतीसाठी साधने पुरवणे आणि त्यांचा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे हा आहे. यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता ही सविस्तर माहिती आम्ही या लेखांमध्ये केली आहे. Tractor Anudan Yojana

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज (Farmers need tractors)

शेतकरी बांधवांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्च येणार आहे. तर आपण पाहत असतो की मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत छोट्या ट्रॅक्टरला कमी खर्च येतो आणि आणि फायदेशीर देखील आहे. यामध्ये कडधान्य, हळद, भाजीपाला, ऊस, भात अशा पिकांचे हे ट्रॅक्टर उपयुक्त ठरतात. विशेष लहान भूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. जेणेकरून त्यांना या ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक व्यवसाय उभा करता येणार आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेतीचे कामे करून एक उदारनिर्वाह निर्माण करू शकतात.

योजनेसाठी लागणारे आवश्यक अटी (Required conditions for the scheme)

जर तुम्ही देखील या योजनेचा अर्ज करू इच्छित असाल, तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती किंवा नवबद्ध समाजाचा असावा, स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. शेतकरी बचत गटामार्फत ही अर्ज करता येतो.

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required documents for the scheme)

  • आदिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • 7/12,8 अ उतारे
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • बचत गट प्रमाणपत्र ( अर्ज गटामार्फत करत असाल तर)

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम, mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टल वर जाऊन अर्ज करता येणार आहे. साठी तुमच्याकडे असलेल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि अर्ज सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज प्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे तिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तत्व करावी लागणार आहे.

ट्रॅक्टर खरेदीसाठी किती अनुदान मिळणार? (How much subsidy will be available for purchasing a tractor?)

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला 90% अनुदान देण्यात येणार आहे. तर याचे सविस्तर गणित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या टॅक्टर खरेदीसाठी लागणारा खर्च 3.5 लाख आहे. तर त्यात 90% अनुदान म्हणजे सुमारे 3.15 लाख उर्वरित 10% रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यावर ती उपकरणे तरी केली जातात अनुदान थेट बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणाली अंतर्गत जमा होते.

मित्रांना अर्ज करताना काही महत्वाच्या काळजी देखील घ्या, सुरू कागदपत्रे स्पष्ट आणि अद्यावत असावे. बँक खाते आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे. अर्जातील सर्व माहिती अचूक असावी.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केली ट्रॅक्टर अनुदान योजना;पात्र लाभार्थ्यांना मिळणार 5 लाख रुपये! असा करा अर्ज

Leave a Comment

error: Content is protected !!