Today’s weather : IMD चा मोठा इशारा; या पाच जिल्ह्यांना गारपिटचा इशारा, हवामान अंदाज वाचा

Today’s weather forecast : भारतीय हवामान (IMD) विभागाने पुढील पाच दिवस काही जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमी वरती काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. Today’s weather forecast

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, कोकणात कोरड वातावरण राहील तर दुपारी ऊन वाढण्याची शक्यता आहे. बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासह गारपिट पडण्याचा इशारा दिलेला आहे. तर लातूर, धाराशिव, अकोला या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज वर्तवला आहे.

त्यानंतर 12 एप्रिल रोजी गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतीचे नुकसान होणार नाही.

तर 13 एप्रिल रोजी चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट पडण्याचा इशारा दिलेला आहे. यामुळे हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

त्यानंतर 14 एप्रिल रोजी लातूर आणि नांदेड या ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करायचे आहे.

10 एप्रिल पासून उष्णतेपासून मिळणार दिलासा

  • 10 एप्रिल पासून सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे भारतात काही थंडवा देणारी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमी वरती वादळी वारे विजा आणि हलक्याफलक्या पावसामुळे तापमान घट्ट होईल मात्र गुजरात मध्य प्रदेशात तापमानाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तनात येत आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून हवामान विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

Leave a Comment

error: Content is protected !!