सुकन्या समृद्धी योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यावर किती लाख नफा मिळेल ? जाणून घ्या…

Sukanya samriddhi Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना सुरू करत आहे. देशातील सुप्रसिद्ध असलेली सुकन्या समृद्धी योजना ही देखील याच गुंतवणुकीच्या योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत देशातील मुलींच्या नावावर तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्याची चिंता दूर करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीच्या नावे खात उघडला जाऊ शकते. या योजनेअंतर्गत ज्या मुलींचे वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. त्या मुलींची खाते उघडले जातात आणि त्यांना या सरकारी योजनेचा लाभ दिला जातो. या सरकारी योजनेअंतर्गत मुलींना 8.2% चा जबरदस्त व्याजदर दिला जातो. येथे आपण या योजने संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये जमा केले तर तुम्हाला एकूण किती रुपये मिळतील? नफा किती मिळेल? याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत.

सोन्याचे दर घसरले का वाढले? जाणून घ्या या आठवड्यात 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दारात काय झाल्याबद्दल?

सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट

सुकन्या समृद्धी योजनेत एक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींची खाते उघडता येऊ शकतात. मात्र ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत अशा कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त खाते तुम्ही उघडू शकतात. या योजनेत तुम्ही वर्षाला किमान 250 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर्यंत पैसे जमा करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन उघडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये देखील खाते उघडू शकता.

मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी लाभार्थ्यांना मदत दिली जाते. मुलींच्या भविष्यासाठी ही एकदम सुरक्षित गुंतवणूक आहे. लोकांना मुलींविषयी सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी ही योजना काम करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असावा. मुलींचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. Sukanya samriddhi Yojana

हे पण वाचा | बिझनेस आयडिया असावी तर अशी! दिवसाला फक्त चार-पाच घंटे काम करा आणि कमवा लाखो रुपये?

आवश्यक कागदपत्रे
  • मुलीचा जन्म दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • मुलींच्या आई-वडिलांचे आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा.

हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करणे एकदम सोपे आहे. या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेत खाते उघडू शकता. खाते उघडल्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि पैसे जमा करावे लागतील. सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्टे मुलींच्या भविष्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी एवढाच आहे.

हे पण वाचा | राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती

योजनेचा लाभ कधी मिळतो?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने उघडलेले हे खाते मुलगी एकवीस वर्षाची होईपर्यंत म्युच्युअल होत नाही. मात्र जर तुमची मुलगी 18 वर्षाची झाली आणि तुम्हाला तिचं लगेच लग्न करायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही हे अकाउंट बंद करू शकता. याशिवाय आणखीन काही वेगळ्या परिस्थितीमध्ये पाच वर्षानंतर तुम्ही हे खाते बंद करू शकतात. लक्षात ठेवा हे खाते उघडल्यानंतर कमीत कमी पाच वर्षानंतर हे खाते बंद केले जाऊ शकते. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे आधी या योजने संबंधित सर्व माहिती घेऊनच आपले पैसे या योजनेत गुंतवा.

हे पण वाचा | सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोनं खरेदी करायचे असेल तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या..

या योजनेअंतर्गत किती लाभ मिळेल?

सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवलेले रक्कम एकदम सुरक्षित आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभ देखील जास्त प्रमाणात मिळतो. तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी ही एकदम उत्तम योजना आहे. जर या सरकारी योजनेत दरवर्षी तुम्ही एक लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 21 वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये एकूण 46 लाख 18 हजार 385 रुपये जमा होतील. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम 15 लाख रुपये एवढी असेल. आणि तुम्हाला मिळालेल्या व्याजाचा लाभ 31 लाख 18 हजार 385 रुपये एवढा असेल. ही एक सरकारी योजना आहे त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. या योजनेत तुम्हाला फिक्स आणि गॅरंटेड रिटर्न मिळणार आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची असुरक्षित मनात आणू नका.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सुकन्या समृद्धी योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यावर किती लाख नफा मिळेल ? जाणून घ्या…”

Leave a Comment

error: Content is protected !!