ST Bus News : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ST महामंडळात लवकरच मोठ्या प्रमाणावरती भरती सुरू होणार आहे. तुम्ही देखील नोकरीसाठी इच्छुक असाल तर आत्ताच तयारीला लागा ही भरती प्रक्रिया आतापर्यंतची सर्वात मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. महामंडळ अंतर्गत 25 हजार नव्या बसेस खरेदी करण्यात आलेला असून नव्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी हजारो चालक वाहक आणि तांत्रिक कर्मचारी भरती केली जाणार आहे. ही घोषणा खूप राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ST महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असून, अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे तो पाठवण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीचे दरवाजे उघडणार आहेत.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 पर्यंत उच्च न्यायालयाचे आदेशामुळे एसटीमध्ये नोकर भरती थांबवण्यात आलेली होती. पण आता अनेक कर्मचारी निवृत्त होत आहेत आणि महामंडळात नव्याने 25000 बस गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे नव्या आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणावरती भरती केली जाणार आहे.
कुठल्या पदांवरती होणार भरती?
- चालक
- वाहक
- यांत्रिक अभियंते
- इतर तांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी
पद भरती मध्ये विशेष चालक आणि वाहकांच्या हजारांच्या संख्येने जागा उपलब्ध होतील. याशिवाय, PPP तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या टर्मिनल्स व इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अभियंतेची देखील मोठी मागणी असेल. त्यामुळे अभियंता पदावर करार पद्धतीने किंवा सरळ सेवेने नियुक्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेला आहे.
भरती प्रक्रिया कशी असणार?
सध्या अंतिम आकृतीबंध तयार करण्यात आलेली नाही यावरती काम सुरू आहे. त्यानंतर विविध विभागांनी आपापल्या रिक्त पदांचा फिर आढावा घेऊन राज्य सरकारकडे एकत्रित भरती प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये काही भरती सरळ सेवा पद्धतीने, तर काही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
परिवहन मंत्री म्हणाले की, एसटीचा दर्जा व्हायचं असेल तर आधुनिक बस बरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक खात्याने रिक्त पदांच्या तपशील तयार करून लवकरात लवकर भरतीची तयारी सुरू करावी याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
बेरोजगार तरुणांसाठी एसटीच्या पुनर्जीवनासाठी हा एक निर्णय एक टप्पा मानला जात असून हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील या नोकरीत अर्ज करू इच्छित असाल तर लवकरात लवकर तयारी करा आणि पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा.
हे पण वाचा | Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा
1 thought on “ST Bus News : ST महामंडळ मध्ये बंपर भरती, नोकरी करण्याचे सुवर्णसंधी! वाचा सविस्तर माहिती”