SSC HSC Result 2025 | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आत्ताच फोन चार्ज करून ठेवा, नेट डेटा भरपूर ठेवा कारण सर्व ठरल आहे, लवकरच लागणार दहावी आणि बारावीचा निकाल! बातमी एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ठरू शकते कधी लागणार आहे हा निकाल जाणून घ्या सविस्तर माहिती.
दहावीच्या आणि बारावीचे विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी खुशखबर समोर आलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे महिने भरायची तक मग आता संपणार आहे. अंदाज लावणं आता थांबायला आलय. 2025 च्या बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहे. असं शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेला आहे. यावेळी वेळेत पेपर, वेळेत तपासणी आणि वेळेत निकाल मंडळांना बऱ्याच वर्षांनी वेळेवर काम केलंय, असं शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झालेल्या आहेत.
निकाल कधी लागणार?
बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली, तरी सूत्रांच्या मते बारावीचा निकाल 15 मे च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल 17 किंवा 18 मे ला लागेल. असा जवळपास निश्चित झालेला आहे. एकंदरीतच यंदाचा निकाल मे महिन्यामध्ये लागणार त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी पुढील ऍडमिशन प्रक्रियेसाठी फार वाट पाहण्याची गरज नाही.
राज्यातल्या नऊही विभागांमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या सगळ्या विभागांमध्ये लाखो उत्तर पत्रिका वेळेत तपासून जमा करण्यात आलेल्या आहेत. 18 एप्रिल ही अखेरची मुदत होती, आणि त्याआधीच सगळं काम व्यवस्थित झालं आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये जवळपास एक लाख ८५ हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. तर लातूर विभागात 95 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यभरातून कोट्यावधी उत्तर पत्रिका शिक्षकांनी तपासल्या, बोर्डाने वेळोवेळी फॉलोअप घेऊन सगळं काम वेळेत पूर्ण केलेला आहे.
कॉफी प्रकरणावरती काय झालं?
यंदा काही जिल्ह्यात कॉपी केसेस नोंदवण्यात आल्या होत्या- विशेषता परभणी, जालना आणि संभाजीनगर या भागांमधून, मंडळाने तातडीने त्या विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली असून प्रत्येक प्रकरणात निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे निकालांच्या दिवशी गोंधळ होणार नाही असेही खात्रीपूर्वक सांगण्यात आल आहे.
निकाल लवकर लागण्याचा फायदा?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे- निकाल मे मध्येच लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ऍडमिशन साठी भरपूर वेळ मिळणार आहे. महाविद्यालये, जुनिअर कॉलेज आणि विविध कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश प्रक्रिया जून पासून सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेवर निकाल लागणे हे फार फायदेशीर ठरणार आहे.
सगळं काम झालंय, निकालाची तयारी सुरू आहे, आणि विद्यार्थी पालक सगळे एकाच प्रश्नावर “निकाल कधी?”आता बोर्डाकडून अधुकृत घोषणाची वाट बघायची. पण लक्षात ठेवा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोबाईलवर एक गोष्ट पाहायला मिळणार HSC/SSC Result 2025 Live Update यामुळे आता फोन चार्ज करून ठेवा, नेट भरपूर ठेवा आणि निकालाच्या दिवशी सकाळपासून वेबसाईट क्रॅश होईल याची तयारी ठेवा
( पुढील अपडेट साठी इथेच थांबा… कारण निकाल कुठे लागतोय, कसा पाहायचा, सर्वात आधी माहिती इथेच मिळेल!)
हे पण वाचा | HSC SSC Result Dates : इयत्ता दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर? वाचा सविस्तर माहिती