Solar Panel Scheme : घराघरात वाढतं विज बिल, महागाईच्या काळात सामान्य माणसाच्या खिशाला लागणारा चटका आणि दर महिन्याला येणाऱ्या हजारांचा बिलाचा त्रास… हे सगळं आता थांबणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली पी एम (PM Surya Ghar Yojana) सूर्यघर योजना. त्यामुळे तुम्हाला आता मोफत वीज मिळणार आहे, या योजनेने तुमचं घराचं वीज केंद्र बनवण्याची मोठी संधी आहे. सोलर पॅनल छतावर बसायचा आणि दर महिन्याला 300 रुपये युनिट पर्यंत वीज फुकट वापरायची एवढी सोपी आणि फायदेशीर योजना आजवर कधीच आली नव्हती. विशेष म्हणजे, सरकारकडून मिळणाऱ्या भरघोस अनुदानामुळे ही संपूर्ण यंत्रणा सामान्य माणसाच्या आवाक्यात आली आहे. Solar Panel Scheme
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेमुळे देशभरातील एक कोटी घर एक सौर ऊर्जाच्या छत्राखाली येणार आहे. ज्यांचं उत्पन्न कमी किंवा माध्यम आहे, अशा घरांसाठी ही योजना संजीवनी सारखे ठरत आहे. एकदा सोलर सिस्टम बसवली, की दरमहा वीज बिलावर होणारी बचत चक्क 3 ते 4 हजार पर्यंत जाऊ शकते. वर्षाकाठी ही बचत 30- 40 हजार रुपयांवर पोहोचते आणि त्यातच घरात वापरण्यात येणाऱ्या अतिरिक्त विजेचा विक्री करून ग्राहक स्वतः ही उत्पन्न कमवू शकते. अगदी ग्रामीण भागात ही संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठी सरकारने तब्बल 75,021 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या योजनेत सरकारकडून मिळणारा अनुदान ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. उदाहरणार्थ, जर एखादं घर तीन किलो व्हॅट क्षमतेची सोलर सिस्टम बसवत असेल, तर सरकारकडून 78,000 रुपया आणि त्यावरून आणखी 30000 रुपये अशा एकूण 1.08 लाख रुपयांचा अनुदान मिळतं. त्यामुळे सोलर यंत्रणा बसवण्याचा खर्च खूपच कमी होतो आणि सामान्य कुटुंबालाही सोलरवर जाणं शक्य होतं.
कोपरगाव जवळी शिंदे वस्तीतील संजय शिंदे यांनी नुकतीची यंत्रणा बसवली आणि त्यांचा विज बिल दरमहा 2,800 रुपयांवरून थेट रूपांपर्यंत कमी झाल. काही महिन्यात जर संजय यांचं वीज बिल शून्य आलं, आणि त्यांनी उरलेल्या विजेचं वितरण कंपन्यांना विकून महिन्याला सुमारे 600 रुपये कमवले.
या योजनेमागे सरकारचा उद्दिष्ट स्पष्ट आहे, भारताला स्वच्छ, शाश्वत आणि स्वयंपूर्ण ऊर्जेच्या दिशेने घेऊन जाण. सौर ऊर्जेचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जनात प्रचंड घट होते. अंदाजे, एक किलो वेट सोलर सिस्टम मुळे वर्षाला 1 टन कार्बन कमी उत्सर्जित होत. ही योजना केवळ विजेची बचत करत नाही, तर पर्यावरणासाठी ही वरदान ठरते. याशिवाय, सोलार यंत्रणाची बसवनी, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. अगदी आयटीआय किंवा डिप्लोमा घेतलेला तरुणांना यातून चांगल्या पगाराचं काम मिळत आहे. त्यामुळे ही योजना ग्रामीण विकासाला हातभार लावत आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्याल
सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या सौर रूप पोर्टलवर जावा लागेल. त्यानंतर तिथे नोंदणी करायचे आहे, त्यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचं. ‘Apply For Root Top Solar’ वर क्लिक करून तुमची माहिती भरायची आणि डिस्काम कडून तांत्रिक तपासणी होईपर्यंत थांबायचं. त्यानंतर मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून सोलर सिस्टम बसवायचे आणि नेट मीटरिंग करून घ्यायचं. अखेरीस अनुदानासाठी बँकेचा तपशील आणि रद्द चेकवर पोर्टलवर अपलोड केला किती दिवसात अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल.
अर्थात, यासाठी काही पात्रता निकष आहेत, अर्जदार भारतीय नागरिक असावा, घरावर सोलर सिस्टम बसवण्यासाठी योग्य जागा असावी, आजी कोणतही सोलर अनुदान घेतलेलं नसावा, आणि वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. शिवाय, सोलर यंत्रणा सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच बसवली पाहिजे.
सध्या तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम मुळे मासिक 300 युनिट्स वीज निर्मिती शक्य आहे. जर एखादा घर यापेक्षाही कमी वीज वापरत असेल, तर त्यांचं संपूर्ण वीज शून्यावर येऊ शकता. उर्वरित वीज विक्री करून उत्पन्न मिळवता येतात. परणार्थ जर एखादा घर वर्षाला 12000 युनिट्स वीज वापरत असेल आणि सोलार मधून 600 युनिट्स निर्माण होत असतील, तर फक्त अर्ध बिल भरावा लागतं. त्यामुळे दरवर्षी हजारांची बचत होते आणि आतापर्यंत देशात अनेक घरातून शून्य वीज बिल आलं आहे, तर काहींनी पूर्वी तीन हजार रुपये येणाऱ्या बिलाच्या ऐवजी आठशे रुपयांचे बिल येतंय. ही बचत तुमची पुढचं इन्वेस्टमेंट बनू शकता.
आजच्या घडीला, वाढत्या वीज दरांमुळे सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. अशावेळी Pm सूर्यघर योजना म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. सरकारकडून मोफत सोलार बसून घेण्याचे आणि त्यातून वीज बिल शून्यावर आणण्याची संधी कोणीच गमू शकत नाही. फक्त एक नोंदणी आणि थोडा पुढाकार आणि तुमचं घर होईल संपूर्ण, स्वच्छ ऊर्जेचे पावर हाऊस!
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे?