फक्त २४ तासांचा प्रश्न! पहिल्याच श्रावणी सोमवारी ३ राशींचं नशीब उघडणार कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.


Shravan Horoscope | श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि देवांच्या कृपेसाठी अविरत प्रार्थना करण्याचा काळ. २५ जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि पहिला श्रावणी सोमवार येतोय अगदी काही तासांत. या सोमवारी, म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी एक अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग तयार होतोय – महालक्ष्मी राजयोग. आणि या योगाचा थेट परिणाम दिसणार आहे मेष, कर्क आणि धनु या ३ राशींवर, ज्यांचं नशीब उजळणार आहे एका रात्रीत. Shravan Horoscope

महालक्ष्मी राजयोग म्हणजे काय?

२८ जुलै रोजी चंद्र आणि मंगळ ग्रहांची युती होत आहे. चंद्र म्हणजे भावना समृद्धी आणि अंतर्मन, तर मंगळ म्हणजे धैर्य, ऊर्जा आणि कृती. हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून तयार होतो महालक्ष्मी राजयोग असा योग जो अचानक धनलाभ, यश, नवे संधी, आणि सौख्य घेऊन येतो.

हा योग खूपच दुर्मीळ मानला जातो आणि याचे फायदे तत्काळ दिसू लागतात विशेषतः त्या राशींना ज्या सध्या प्रयत्नशील आहेत पण अपेक्षित यश हुलकावणी देत होतं.

या ३ राशींचं भाग्य फुलणार

मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी हा महालक्ष्मी योग धक्कादायक सकारात्मक बदल घेऊन येतोय. घरात एखादं शुभकार्य होण्याची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढणार म्हणजे आर्थिक स्थैर्य. जोडीदारासोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार पूर्ण होऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट नवं संधी घेऊन येईल. तुम्हाला मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे तुमचं सामाजिक स्थान बळकट होईल. वैवाहिक नातं अधिक घट्ट होईल. सोमवारी गायीला गूळ आणि रोटी खाऊ घाला. महादेवाला पांढरं फूल अर्पण करा.

कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांमध्ये सध्या आत्मविश्वासाचा जागर सुरू आहे आणि याच आत्मविश्वासामुळे महालक्ष्मी राजयोगाचा सर्वात जास्त फायदा यांनाच होईल सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना यश. ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढणार, नव्या जबाबदाऱ्या मिळणार. तुमचं गोड बोलणं आणि निर्णय क्षमताचं कौतुक होणार. लोक तुमच्या सल्ल्याचं कौतुक करतील. व्यावसायिक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी ही वेळ योग्य आहे. सोमवारी दूध आणि साखर मिसळलेलं जल शिवलिंगावर अर्पण करा. ओंकाराचा जप करा.

धनु राशी : धनु राशीच्या जातकांसाठी हा योग सर्वांगीन विकासाचा योग आहे. अचानक धनलाभ एखादं जुने पैसे अडकले असतील, ते परत मिळू शकतात. परदेशात जाण्याचे योग तयार होत आहेत. गुतवणुकीतून फायदा होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. जुन्या अडथळ्यांना दूर करत आता नवी दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं महत्व वाढणार आहे. सोमवारी शिवलिंगावर केशर मिसळलेलं पाणी अर्पण करा. लक्ष्मी मंत्राचा जप करा.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार

Leave a Comment

error: Content is protected !!