Shetkari Karjmafi 2025 | शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

Shetkari Karjmafi Update 2025 | गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवर संकटाचा काळ कोसळलेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या उत्पादन खर्चामुळे कमी झालेले उत्पन्न आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शेती आता तोट्याचा व्यवसाय ठरू लागलेली आहे शेतकऱ्यांना शेतीला गेलेला खर्चही निघत नसल्याचे सध्या शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त केला जात आहे. तर अशा पार्श्वभूमी वरती राज्य सरकारने निवडणूक पूर्वी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी(Shetkari Karjmafi) करू असे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्प झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेल्या धुळीस मिळाले आहेत.

अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील बँकांकडून कर्ज वसुलीचे प्रयत्न सुरू असून, सरकारने कर्जमाफी देईल या अशाने शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यास टाळाटाळ केलेली आहे. तर दुसरीकडे बँकांनी नवीन कर्ज वाटप बंद केल्याने शेतकरी आणखी अडचणी सापडलेला आहे. Shetkari Karjmafi Update 2025

खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे का?

  • शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकऱ्यांमुळे टिकून आहे. मागील गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठे नैसर्गिक आपत्ती व बाजार अस्थिरतेमुळे योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. सततच्या अतिवृष्टी, गारपीट दुष्काळ यामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. याआधी कर्ज माफी योजनांमध्ये अनेक पात्र शेतकरी वंचित राहिलेले आहेत. सरकारने दिलेल्या वचनानुसार संपूर्ण कर्जमाफी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आता लागून राहिलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी कधी होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

मागील कर्जमाफी योजना

या आधी देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कर्जमाफी योजना राबवलेल्या आहेत. महाराष्ट्र मध्ये मोठ्या दोन कर्जमाफी योजना राबवल्यामुळे शेतकऱ्यांवरचा मोठा आर्थिक भर कमी झालेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 2017 वर्षी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना राबवली या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे. मात्र आजही 6000 कोटी रुपयांचे वाटप प्रलंबित आहे.

हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, संपूर्ण माहिती जाणून घ्या

तर त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्त योजना राबवली. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती कर्जमाफी करण्यात आली. परंतु, ४९ हजार शेतकरी अजूनही लाभांपासून वंचित आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांवरती कर्जमाफीचा बोजा किती?

राज्यातील शेतकऱ्यांवरती थकीत कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अशक्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांवरती 31 हजार कोटी रुपयांचा बोजा यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे.

सरकार ठोस निर्णय कधी घेणारं

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सरकारकडून सकारात्मक निर्णयाची वाट पाहत आहे. परंतु कर्जमाफीच्या आश्वासन पूर्ण करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर विरोधकांकडून सरकारंवरती जोरदार टीका केली जात आहेत. काही तज्ञांच्या मते सरकार त्यांच्या शेवटच्या कार्यकाळ मध्ये कर्जमाफीची घोषणा करू शकते. तर सरकारच्या नवीन हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करत चला व तुम्हाला काय वाटते सरकार संपूर्ण कर्जमाफी करेल का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा!

3 thoughts on “Shetkari Karjmafi 2025 | शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती”

  1. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे . कारण सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासन हे पूर्ण करणे हे त्यांचे काम आहे नाहीतर जनतेचा सरकारवर ला विश्वास पूर्णपणे उडणार आहे.

    Reply
  2. लवकरात लवककर नीरनय घेउन प्रश्न मार्गी लावावा नाहीतर गळफास घेऊन मरावे लागनार याच्या शिवाय पर्याय नहि

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!