SBI Job Advertisement : नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशातील नामांकित आणि सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी ज्युनिअर असोसिएट (क्लर्क पद) पदांसाठी मोठी भरती जाहीर केलेली आहे. जर तुम्हाला देखील सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खरंच आनंदाची ठरणार आहे. कारण एसबीआय मध्ये क्लर्क भरती म्हणून हे पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 6,589 जागा असून अर्जाची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा. SBI Job Advertisement
हे पण वाचा | SBI मध्ये बंपर भरती सुरू; नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी
पात्रता निकष
वयोमर्यादा : एक एप्रिल 2025 रोजी वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक. (जन्म 2 एप्रिल 1997 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान.)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही शाखेतील पदवी. अंतिम वर्षातील विद्यार्थी तात्पुरते अर्ज करू शकतात, मात्र निवड झाल्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (अधिक माहितीसाठी भरतीची पीडीएफ जाहिरात वाचणे गरजेचे.)
निवड प्रक्रिया काय?
सर्व प्रथम पूर्व परीक्षा, 100 गुणांची चाचणी (कालावधी एक तास)
मुख्य परीक्षा : 200 गुणांसाठी 190 प्रश्न ( कालावधी दोन तास 40 मिनिटे)
स्थानिक भाषा चाचणी : ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा शिकलेली नाहीत त्यांना मुख्य परीक्षेनंतर 20 गुणांची चाचणी द्यावी लागेल.
अर्ज शुल्क : या पद भरतीसाठी General/ ओबीसी/ EWS – 750 आणि SC/ ST/ PwBD/ Xs/ DXS – शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत
या पद भरतीत अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज करू शकता किती गेल्यानंतर भरती लिंक वरती क्लिक करून नोंदणी करा. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
(अर्ज करण्याआधी भरतीचे सूचना नीट वाचा. पीडीएफ डाऊनलोड करून घ्या. एकदा अर्ज केल्यावर तू मागे घेता येणार नाही आणि भरलेलं शुल्क परत मिळणार नाही.)
1 thought on “स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 6,589 पदांसाठी मोठी भरती सुरू लगेच अर्ज करा”