SBI FD Scheme: तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल. आजकाल प्रत्येक जण आपल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल असा प्रश्न पडतो. तर एसबीआय मध्ये फिक्स डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे यामुळे यामध्ये केलेले गुंतवणूक नियमित सुरक्षित असते. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत FD चे व्याजदर कसे आहेत आणि एसबीआय मध्ये 24 महिन्यासाठी दोन लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती फायदा मिळेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा| तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती निधी खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जाणून घ्या सर्व माहिती..
SBI FD चांगला पर्याय आहे का?
फिक्स डिपॉझिट करण्यासाठी एसबीआय ही बँक योग्य आहे का त्याचबरोबर एसबीआय मध्ये FD वर किती टक्के रिटर्न्स मिळते. फिक्स डिपॉझिट म्हणजे निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करणे ज्यावर बँक तुम्हाला निश्चित दराने व्याज देते. मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम व्याजासहित परत मिळते. एसबीआय मध्ये एफडी करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो त्याचे अनेक कारणे आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
- भारतीय रिझर्व बँक ने एसबीआय ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेपैकी एक म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच तुम्ही गुंतवलेले पैसे या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
- एसबीआय ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी बँक असल्यामुळे तिच्यावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे.
- एसबीआय सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधी साठी एफडी योजना चालवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…
SBI FD व्याजदर किती आहे?
आता कोणत्याही बँकेत एफडी करायची म्हटल्यानंतर त्या बँकेला किती टक्के व्याजदर आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. गेल्या काही काळापासून आरबीआय ने रेपो दरात कपात केल्यामुळे अनेक बँकांच्या एफडी दरामध्ये घट झाली आहे. मात्र एसबीआय बँकेला याचा फटका बसला नाही. आजही एसबीआय आपल्या ग्राहकांना इतर काही बँकेच्या तुलनेत जास्त व्याजदर देत आहे. सध्या एसबीआय बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजदर दिला जातो. यामध्ये 3.50 ते 7.10% पर्यंत व्याज दिले जाते. प्रत्येक कालावधीनुसार व्याजदर बदलत असते. SBI FD Scheme
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना गुंतवणुकीसाठी खास 3 योजना; मिळेल जबरदस्त फायदा, जाणून घ्या
24 महिन्याच्या एफडीवर किती व्याजदर मिळेल?
जर तुम्ही एक ते दोन वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एसबीआयची एफ डी योजना 24 24 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकतात. या योजनेत सामान्य आणि ज्येष्ठ नागरिक अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगळे व्याजदर आहेत. SBI FD Scheme
- सर्वसामान्य ग्राहक: जर तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल तर तुम्हाला या योजनेत 6.45% व्याजदर दिला जातो.
- ज्येष्ठ नागरिक: जर तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर एसबीआय अशा नागरिकांसाठी विशेष सवलत देत आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना इतर ग्राहकांपेक्षा 0.50% अधिक व्याज दिले जाते. म्हणजेच त्यांना 6.95% व्याजदर मिळेल.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…
दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न्स मिळेल?
आता आपण प्रामुख्याने एसबीआय बँकेमध्ये 24 महिन्यासाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेतून एकूण किती परतावा मिळेल हे जाणून घेऊया. हे सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेगवेगळ्या असेल.
सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा परतावा:
जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल आणि एसबीआयच्या 24 महिन्याच्या एफडी योजनेत दोन लाख रुपयाचे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.45% व्याजदराने मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण 2 लाख 27 हजार 304 मिळतील. याचा अर्थ असा होतो दोन वर्षाच्या कालावधीत तुम्हाला 27304 व्याज म्हणून मिळेल. ही रक्कम तुमच्या मूळ रकमेवर मिळालेला निवड नफा आहे.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुधारित पिक विमा योजना सुरू; जाणून घ्या काय होणार फायदा?
ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा परतावा:
ज्येष्ठ नागरिकांनी एसबीआय मध्ये 24 महिन्यासाठी दोन लाख रुपयाची एफडी केली तर त्यांना 6.95% व्याजदराने एकूण रिटर्न्स 2 लाख 29 हजार 551 रुपये मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षाच्या कालावधीमध्ये 29551 रुपये व्याज मिळेल. सामान्य ग्राहकाच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 2247 रुपये व्याज जास्त मिळत आहे. कारण त्यांना 0.50% अधिक व्याजदर दिला जात असतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर एसबीआय मध्ये 24 महिन्याची एफडी केली तर चांगला परतावा मिळेल आणि तुमची रक्कम सुरक्षित राहील.एफडी मध्ये गुंतवणूक करताना नेहमी तुमचे आर्थिक उद्दिष्टे आणि गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे असते. एसबीआय सारख्या सुरक्षित बँकेत गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्ही देखील एसबीआय मध्ये एफडी करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
1 thought on “SBI मध्ये 2 लाख रुपयांच्या FD वर किती परतावा मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती…”