Saving Schemes For Women: लाडक्या बहिणींना सरकारी योजनेतून महिन्याला 1500 रुपये मिळतात, त्या महिलांना प्रश्न पडतो की या पैशाचे काय करावे? अनेकदा हे पैसे खर्च होतात किंवा बँकेत पडून राहतात. पण जर या पैशाची योग्य गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला याचा मोठा फायदा मिळू शकतो. केवळ 1500 रुपये नाहीतर तुमच्याकडे जमा झालेली जेवढी रक्कम आहे तेवढी तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी खास योजना घेऊन आलो आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुमची आर्थिक भविष्य सुरक्षित आणि उज्वल होईल.
लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…
1) मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme)
तुमच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा झाले असेल तर ती मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आणि स्थिर पर्याय आहे. कोणत्याही बँकेत एफडी केल्याने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित दराने व्याज मिळते याचा अर्थ तुम्ही गुंतवलेले पैसे आणि त्यावर मिळणारे व्याज याची तुम्हाला आधीच माहिती असते. यामध्ये तुमचा तोटा होऊ शकत नाही. प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देत असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी विविध बँकेचे व्याजदर तपासा. Saving Schemes For Women
विशेष म्हणजे या योजनेत जर तुमचे वय 60 वयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा 0.50% अधिक व्याजदर मिळू शकते. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलाही या बँकेत एफडी करू शकतात आणि आपल्या बचत केलेल्या पैशावर चांगला परतावा मिळून त्यांच्या पैशात वाढ करू शकतात. एफबी चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही विशिष्ट कालावधीसाठी पैसे गुंतवा आणि त्या काळात तुम्हाला हमखास व्याज मिळेल. ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीत सुरक्षितता मिळते.
हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुधारित पिक विमा योजना सुरू; जाणून घ्या काय होणार फायदा?
2) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (senior citizen saving scheme)
जर तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही आकर्षक आणि चांगला फायदा मिळू शकतात. ही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना सेवानिवृत्तीनंतर नेहमीच उत्पन्न म्हणून ठराविक रक्कम मिळावी. या योजनेसाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावे लागेल. या खात्यात तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयाची व जास्तीत जास्त तीस लाखापर्यंतची गुंतवणूक करू शकतात. सध्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 8.20% इतकी आकर्षक व्याजदर मिळत आहे जे इतर अनेक योजनेपेक्षा खूप जास्त आहे.
या योजनेचे मुख्य उद्देश जेष्ठ नागरिकांना आर्थिक धैर्य प्रदान करणे आणि त्यांना आर्थिक लाभ करून देणे. जेणेकरून त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आरामदाय जीवन जगण्यासाठी मोठी मदत मिळेल. यातून मिळणारे व्याज नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होते. ज्यामुळे तुम्हाला मासिक चांगले उत्पन्न मिळू शकते. Saving Schemes For Women
हे पण वाचा| सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर
3) सार्वभैम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond)
सोन्याचे दागिने खरेदी करणे हा भारतीय संस्कृतीचा मोठा भाग आहे. पण आता सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक आधुनिक आणि अधिक फायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे. जर तुमच्याकडे थोडी रक्कम जमा झाली तर तुम्ही सोन्यामध्ये सार्वभैम सुवर्ण रोखे मध्ये गुंतवणूक करू शकतात. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित आणि फायद्याची मानली जाते आणि कठीण काळात सोन्याचे गुंतवणूक नेहमीच मोठ्या कामाला येते.
दागिने खरेदी करण्याऐवजी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. हे रोप सरकारच्या वतीने भारतीय रिझर्व बँक जारी करते या योजनेत तुम्हाला वर्षाला 2.50% व्याज मिळते. जे तुमच्या गुंतवलेल्या सोन्याच्या मूल्यावर आधारित असते. याचा अर्थ तुम्ही सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा सर घेताच पण त्याचबरोबर तुम्हाला नियमित व्याज देखील मिळतो.
हे पण वाचा| शनी देवाकडून उलटी गिनती सुरू! १३ जुलैनंतर ‘या’ ५ राशींचं नशिब होणार झपाट्यानं बलवान, पोरं बाळं खुश, घरात लक्ष्मीचा वास
या योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला सोन्याच्या भौतिक स्वरूपातील जोखीम म्हणजे पुरी शुद्धता सुरक्षितता याची चिंता नसते. तसेच दागिने बनवताना लागणारे मेकिंग चार्जेसही लागत नाहीत. जेव्हा तुम्ही हे रोप विकता तेव्हा सोन्याच्या तात्कालीन किमतीनुसार तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. ज्यामुळे सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा तुम्हाला थेट फायदा मिळतो. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरतो आहे.
वरील सर्व योजना तुमच्यासाठी मोठ्या फायद्याचे ठरू शकतात पण कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि उद्दिष्टे वेगळी असतात त्यामुळे तुमच्यासाठी कोणती योजना सर्वात योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन असणे खूप महत्त्वाचे आहे. ही माहिती केवळ सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे.