S-400 Protection system : भारत आणि पाकिस्तान मध्ये तनावाच्या पार्श्वभूमी वरती भारतीय हवाई दलाने काल रात्री एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नाला भारतीय हवाई दलाने S-400 या रशियन बनावटीच्या आधुनिक संरक्षण प्रणालीच्या साह्याने त्वरित उत्तर दिलेला आहे. ही घटना भारताच्या संरक्षण क्षमतेतील झेप दर्शवते.
S-400 म्हणजे काय?
S-400 “Triumf” ही रशियाने विकसित केलेली लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली विविध प्रकारच्या हवाई धोक्यांपासून – जसे की लढाऊ विमान, ड्रोन, क्रुझ मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल्स- संरक्षण करू शकते.
मुख्य घटक – रडार, लॉन्चर, कमांड सेंटर
S-400 प्रणाली तिन प्रमुख घटकांवर कार्य करते.
-शक्तिशाली रडार 600 km अंतरावर असलेले लक्ष ओळखू शकते.
- विविध प्रकारच्या क्षेपणास्त्र परीक्षण करते.
- लक्ष ओळखणं, त्यांचे मूल्यांकन आणि योग्य क्षेपणास्त्र प्रक्षेपण यावर नियंत्रण ठेवतो.
S-400 ची वैशिष्ट्ये
- 400 किमी पर्यंत लक्ष भेदन्याची क्षमता
- 30-36 लक्ष एकाच वेळी ओळखण्याची आणि त्यांना निष्परभ करण्याची क्षमता.
- अत्यंत अचूकता आणि जलद प्रतिसाद
- दैनंदिन हवाई कल्याण पासून ते बॅलेस्टिक मिसाइल पर्यंतचा मुकाबला.
भारतासाठी सामरीक महत्त्व
2018 मध्ये भारताने रशिया सोबत सुमारे $5 अब्ज डॉलर्सचा करार करत 5 S-400 युनिट्स खरेदी करण्याचं ठरवलंय. भारतासाठी ही प्रणाली चीन आणि पाकिस्तानच्या संभाव्य हवाई आक्रमणांना प्रतिउत्तर देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
चीन, तुर्की आणि इतर काही देशांनी S-400 ची खरेदी केली आहे. यामुळे NATO राष्ट्रांना देखील याची भीती वाटते. ही प्रणाली जगातील सर्वोच्च हवाई संरक्षण यंत्रणांपैकी एक मानली जाते.