RBI News : भारतातील सायबर गुन्हेगारांच्या संघटना झपाट्याने वाढत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी आरबीआय ने मोठा निर्णय घेतलेला आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या युक्त वापरून शेतकऱ्यांचा नागरिकांना गंडवल्याचे प्रकरण सध्या समोर आलेला आहे. गुन्हेगार बँक खात्यावर डल्ला मारत असल्याची घटना सध्या घडत आहे. इंटरनेट वापर वाढल्याने आणि डिजिटल पेमेंट प्रणाली प्रगत झाल्याने हे गुन्हे अधिक प्रमाणात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सायबर फसवणूकीला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. RBI News
बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षेसाठी आरबीआयची ठोस पावले
आरबीआयच्या चलन विषयक समितीच्या बैठकीमध्ये 7 फेब्रुवारी रोजी गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशभरातील बँकांना आणि वित्तीय संस्थांना सायबर सुरक्षासाठी अधिक कडक धोरणे लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळे बँका ग्राहकांचे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.
डिजिटल पेमेंट साठी मजबूत सुरक्षा प्रणाली
आरबीआयने डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंग व्यवहार सुरक्षित करण्यासाठी नवीन ड्यूअल ऑथेंटीकेशन प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांना पायबंध घालता येणार आहे.
परदेशी आर्थिक व्यवहारांवर कठोर नियंत्रण
भारतातील सायबर गुन्हेगार अनेकदा प्रदेशातून आर्थिक व्यवहार करत असल्याचे आढळले त्यामुळे आरबीआय आता देशाबाहेर होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
नवीन बँकिंग डोमेन प्रणाली
बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी आरबीआय ने बँकिंग डोमेन बदलण्याचा निर्णय घेतलेला बँकांच्या वेबसाईटसाठी fin.in हे नवीन डोमेन वापरण्यात येणार आहे.
हे पण वाचा | 50 रुपयांच्या नव्या नोटेबाबत मोठी अपडेट; RBI लवकरच जारी करणार नवीन नोट
विशेष इंटरनेट नेटवर्कची स्थापना
सध्या सरकारी बँका बीएसएनएल आणि एअरटेल नेटवर्क अवलंबून आहेत. मात्र आरबीआय बँकिंग क्षेत्रासाठी स्वतंत्र इंटरनेट नेटवर्क तयार करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येणार आहे.
सायबर सुरक्षेसाठी संयुक्त प्रयत्न गरजेचे
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलेले आहे की, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी बँका, सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आरबीआयच्या नव्या उपयोजना लवकर अमलात येणार
परवाच्या नवीन नियम सुरक्षा व्यवस्था एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे भविष्यात बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होणार आहे.
अशाच नवीन ताज्या अपडेट साठी आमच्या पेजला भेट देत रहा!
3 thoughts on “RBI News: आरबीआयचा मोठा निर्णय, तुमचे बँक खाते अधिक होणार सुरक्षित”