50 रुपयांच्या नव्या नोटेबाबत मोठी अपडेट; RBI लवकरच जारी करणार नवीन नोट

RBI New Fifty Rupee Note : रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने ₹50 रुपयांच्या नोटेबाबत महत्वाची माहिती जाहीर केलेली आहे. लवकरच बाजारात ₹50 रुपयांची नवी नोट येणार असून, या नव्या नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असेल. RBI New Fifty Rupee Note

नवी नोट कधी येणार?

RBI ने बुधवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, लवकरच पन्नास रुपयांची नवी नोट जरी करण्यात येणार आहे. या नदीचे रचना सध्याच्या महात्मा गांधी मालिकेतील 50 रुपयांच्या नोटीसारखी असणार आहे. त्यामुळे नोटेच्या रंगात किंवा डिझाईन मध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.

संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये शशिकांत दास यांच्या जागी RBI चा गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आरबीआय द्वारे जारी होणाऱ्या नव्या नोटांवर मल्होत्रा यांची सही असणार आहे.

सध्याच्या नोटा वैद्यच राहणार

रिझर्व बँकेने स्पष्ट केलेले आहे की, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व 50 नोटा वैद्य राहणार आहेत ते नोटा चलनात राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नये असे देखील सांगण्यात आलेले आहे.

सध्याच्या 50 रुपयांच्या नोटीची वैशिष्ट्य

महात्मा गांधी या मालिकेतील पन्नास रुपयांची नोट सध्या चलनात येणार आहे. या नोटेचा काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांकडे खालील प्रमाणे जाणून घ्या.

  • आकार : 66 मिमी x 135 मिमी
  • मुख्य रंग : फ्लोरोसेंट निळा
  • मागील बाजू : नोटेच्या मागच्या बाजूला रथासह हम्पी चे चित्र आहे. हे चित्र भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे
  • सुरक्षा वैशिष्ट्ये : नोटेमध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश केलेला आहे. जे नोटांची सत्यता तपासण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

हे पण वाचा | Bank Rules Update : बँकेच्या नियमांमध्ये मोठा बदल; या गोष्टी करा नाहीतर भरावा लागणार दंड

नोटा छापायची प्रक्रिया आणि ठिकाणी

भारतामध्ये चलन नोट छपाई करण्यासाठी चार प्रमुख नोट्स प्रेस आहेत. या प्रेस पैकी दोन भारत सरकारच्या मालकीची असून उर्वरित दोन आरबीआयच्या अखत्यरीत आहेत. नोटे छापण्याची ठिकाणे नाशिक (महाराष्ट्र) भारत सरकारच्या ताब्यात, देवास (मध्यप्रदेश) भारत सरकारच्या ताब्यात, मैसूर (कर्नाटक) आरबीआयच्या ताब्यात, सालबोनी (पश्चिम बंगाल) आरबीआयच्या ताब्यात, या ठिकाणी चलने नोटांचे छपाई डिझाईनिंग आणि वितरणाची प्रक्रिया पूर्ण होते. आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागाद्वारे या सर्व गोष्टींवरती देखरेख ठेवली जाते.

नव्या नोटा साठी काय अपेक्षित आहे ?

सध्या नोटा प्रमाणेच नव्या नोटामध्ये महात्मा गांधीचे चित्र असणार आहे त्यावरील वैशिष्ट्ये जवळपास समान असतील. परंतु नव्या नोटा चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.

error: Content is protected !!