RBI Breaking News : या 5 बँकेवर RBI ची कठोर कारवाई! या बँकेत तुमचे तर खाते नाही ना चेक करा

RBI Breaking News : देशातील सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आणि थोडीशी चिंता निर्माण करणारे बातमी समोर आली आहे. देशाची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील पाच मोठ्या बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याच्या पार्श्वभूमी वरती मोठी कारवाई केलेली आहे. या बातमीनंतर संबंधित बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांचे थोडेसे टेन्शन वाढणार आहे. मात्र आरबीआयने स्पष्ट केले आहे की या कारवाईचा कोणत्याही थेट परिणाम खातेदारांवरती होणार नाही.RBI Breaking News

या आर्थिक वर्षात ही दुसरी मोठी कारवाया सुन्यापूर्वी काही सरकारी बँकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहे. आता पुन्हा एकदा ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि IDBI बँक या पाच बँकांनी नियम न पाळल्यामुळे यांच्यावरती आर्थिक दंड ठोठवण्यात आला आहे.

कोणत्या बँकेवर किती दंड?

ICICI बँक : ही बँक देशातील नामांकित असून या बँकेवरती नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने ₹98.80 लाख रुपयांचे दंड आकारण्यात आलेले आहे यामध्ये बँकेने KYC, सायबर सुरक्षबाबत तसेच क्रेडिट कार्ड वापराच्या संदर्भात आरबीआयचे काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलं नाही. यामुळे हा दंड ठोठावला आहे.

बँक ऑफ बडोदा – या बँकेवरती ₹61.40 लाख रुपयांचा दंड थोठवण्यात आलेला आहे ग्राहक सेवा आणि बँकिंग सेवा यामध्ये त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

ॲक्सिस बँक : ₹29.60 लाख रुपयांचा दंड आंतरविभागीय खात्यांचे गैरवस्थापन आणि ऑडिटमध्ये नियमबाह्य गोष्टी झाल्यामुळे दंड ठोठवण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र: ₹31.80 लाख रुपयांचे दंड KYC प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

IDBI बँक : ₹31.80 लाख रुपयांचा दंड कृषी कर्जासाठी आलेल्या व्याज सवलतीच्या योजनांमध्ये नियम न पाहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

ती कारवाई पूर्णपणे सकारात्मक आणि नियमक स्वरूपाची आहे. म्हणजे बँकांनी आरबीआयचे नियमानुसार कामना केल्यामुळे त्यांच्या वरती दंड लावण्यात आला आहे. याचा कोणत्याही आर्थिक भार खातेदारांवर येणार नाही. तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित आहेत. कोणतीही व्यवहार अडथळे शिवाय सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी.

सहकारी बँकांबाबत आरबीआय यंदा खूपच कडक झाली आहे. यामध्ये अनेक छोट्या बँकांचे लायसन रद्द करण्यात आले होते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता, ग्राहकाने संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय आता ठोस पावले उचलत आहे.

आरबीआय वारंवार सांगितले आहे की, बँक आणि NBFC कंपन्यांनी ग्राहकांची हित लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. कुणीही नियम मोडले, तर कोठूर कारवाई निश्चित आहे. त्यामुळे बँकांनी अंतरिक व्यवस्था सुधारण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा | Breaking news : महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द! तुमचे खाते तर नाही ना?

Leave a Comment

error: Content is protected !!