Ration Card Update: आता या रेशनकार्डधारकांचे धान्य होणार बंद; राज्य सरकारने जाहीर केली यादी


Ration Card Update: राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने आता शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू केली आहे. जे गरजू नसतानाही मोफत रेशन धान्याचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. राज्यातील गोरगरीब नागरिकांनाच मोफत रेशन योजनेचा लाभ मिळावा हा यामागचा उद्देश आहे. ज्या लोकांकडे चार चाकी वाहन आहे, जे आयकर भरत आहेत, ज्यांचे आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्याकडे जीएसटी क्रमांक आहे अशा शिधापत्रिकाधारकांना आता मोफत धन्य मिळणे बंद होणार आहे.

हे शिधापत्रिकेधारक अपात्र ठरणार

सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील गरज नसलेल्या लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाअंतर्गत पडताळणी सुरू केली आहे. खालील निकष पूर्ण करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना अपात्र ठरवले जाणार आहे. Ration Card Update

हे पण वाचा| सोन्याच्या किमतीत 8200 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याची किंमत

  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे.
  • जे आयकर भरत आहेत.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे.
  • ज्यांच्याकडे जीएसटी क्रमांक आहे.

या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये हजारो लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या संबंधीच्या तक्रारी सरकारकडे आल्यानंतर ही पडताळणी सुरू करण्यात आली आहे काय.

पडताळणी नंतर धन्य होणार बंद

तालुकास्तरावर अन्नपुरवठा निरीक्षक प्रत्यक्षिधापत्रिकाधारकांची पडताळणी करणार आहेत. जे शिधापत्रिकाधारक यांनी कशामध्ये बसत नाहीत त्यांना मोफत मिळणाऱ्या धान्याच्या लाभातून वगळले जात आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच अपात्र लोकांचे धान्य कायमचे बंद केले जाणार आहे असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सरकारने एक नागरिकांसाठी आव्हान केले आहे. जर तुम्ही शिधापत्रिका धारक असाल आणि आता तुम्हाला रेशनची गरज नसेल किंवा तुमच्या कुटुंबाची उत्पन्न वाढले असेल तर तुम्ही स्वतःहून योजनेतून बाहेर पडू शकता. यामुळे खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल आणि तुम्ही स्वतः योजनेतून बाहेर पडून एक जबाबदार नागरिकांची भूमिका बजावू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Ration Card Update: आता या रेशनकार्डधारकांचे धान्य होणार बंद; राज्य सरकारने जाहीर केली यादी”

Leave a Comment

error: Content is protected !!