महिलांसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी, तुम्हाला मिळणार का जाणून घ्या

Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने अंतोदय रेशन कार्डधारकांना होळीनिमित्त मोफत साडी वाटप करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील गरीब हजर महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. राज्यातील कोणत्या महिलांना मिळणाऱ्या बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Ration Card News

रेशन कार्डधारकांना मोफत साडी वाटप!

  • मागील वर्षाप्रमाणे यंदाही सरकारने अंतोदय योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जालना जिल्ह्यातील 44160 आणि पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. स्वस्त धान्य दुकानात मार्फत होळी पूर्वी महिलांना या साड्यावाटप केल्या जाणार आहेत. यामुळे गरजू महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुका नुसार लाभार्थ्यांची संख्या

  • बारामती – 7,975
  • दौंड – 7,222
  • जुन्नर – 6,838
  • पुरंदर – 5,285
  • आंबेगाव – 5,138
  • इंदापूर – 4,453
  • शिरूर – 3,990
  • खेड – 3,218
  • भोर – 1,909
  • मावळ – 1,536
  • मुळशी -540
  • हवेली -251

मोफत साडी वाटपामुळे महिलांसाठी होळीचा आनंद दुप्पट!

गरीब कुटुंबासाठी ही योजना एक मोठा मदतीचा हा ठरणार आहे. यामुळे राज्यातील गरजू गरीब महिलांना सणासुदीनिमित्त एक भेट दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना याचा विशेष लाभ होणार आहे.

साडी घेताना ही खबरदारी घ्या!

गेल्या वर्षी काही ठिकाणी साड्यांचे गुणवत्ता निष्कृष्ट असल्याचे तक्रारी आलेल्या होत्या त्यामुळे यावेळेस वाटप अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी साडी घेताना व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. जर साडी मध्ये दोष आढळल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करा. ही वाटप महिलांना होळी पूर्वी करण्यात येणार आहे. त्यामुळे योग्य वेळी साडी मिळवण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात चौकशी करा.

हे पण वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज

गरीब महिलांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

अंतोदय योजनेअंतर्गत गरजू महिलांना होळीच्या आधी मोफत साडी मिळणार आहे. राज्य सरकारने मागील वर्षी 355 प्रतिसाद खर्च केलेला होता. यंदाही योजनेसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन साडी मिळते का याची खात्री करून घ्या. त्यापूर्वी साडीची गुणवत्ता तपासा, खराबी आढळल्यास तक्रार करा. अधिक माहितीसाठी स्थानिक स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधा.

(नमस्कार मित्रांनो, माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराशी किंवा पाठपुरवठा विभागाकडे चौवकशी करा, अशाच माहितीसाठी आज आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा)

Leave a Comment

error: Content is protected !!