Ration Card KYC : आता घरबसल्या करा रेशन कार्डची केवायसी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ration Card KYC : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला यापुढे रेशन कार्डचा लाभ चालू ठेवायचा असेल तर तुमच्या कार्डची eKYC करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला शासन अंतर्गत यापुढे लाभ मिळणार आहे. शासनाने यापूर्वीच अनेकदा केवायसी करण्याच्या आव्हान केलेले आहे. परंतु अनेक असे नागरिक आहेत, त्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचे लाभ बंद करायचे नसतील तर KYC प्रक्रिया पूर्ण करा तुम्ही कशाप्रकारे घरबसल्या करू शकता हे आपण जाणून घेणार आहोत. Ration Card KYC

आता रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला रेशन दुकानात जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या सहज आपल्या मोबाईलवरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात, त्यासाठी सरकारने 15 मार्चपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. मुदतीपूर्वी जर तुम्ही eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अनेक नागरिकांना eKYC करण्यासाठी मोठी तडजोड करावी लागत होती. स्वस्त दुकानात जाऊन लाईनीमध्ये थांबवावे लागत होते व काहींना दुकानात जाऊन केवायसी करणे शक्य होत नसल्याने. आता मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही शासनाने या सर्व प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून मेरा E-KYC नावाचे ॲप कार्यरत केलेले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचे शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांचे KYC प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात.

तुम्हाला eKYC करण्यासाठी दोन महत्त्वाच्या ॲप्स गरज लागणार आहे. आधार फेस आरडी सेवा आणि मेरा ई- KYC ही दोन्ही ॲप्स मोबाईल मध्ये डाउनलोड केल्यानंतर, फेस ऑथेंटीकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने झटापट आणि सोप्या पद्धतीने पडताळणी करता येणार आहे. या प्रक्रियेमुळे स्वस्त दुकानदार किंवा इतर कोणत्याही अधिकृत सदस्य सहज पद्धतीने eKYC पूर्ण करू शकणार आहात.

रेशन कार्डधारकांना जर यापुढे स्वस्त धान्य व इतर योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की, eKYC प्रक्रिया पूर्ण गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने याला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे यानंतर नागरिकांना लाभ मिळणार नाही त्यामुळे 15 मार्चपूर्वी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

तर नमस्कार मित्रांनो अशाच राशन कार्ड व सरकारी योजनेच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला व हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या बातमीची माहिती मिळेल व त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे त्यामुळे नक्की हा लेख शेअर करा.

3 thoughts on “Ration Card KYC : आता घरबसल्या करा रेशन कार्डची केवायसी, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!